नाशिक : प्रतिनिधी
दि. न्यू एज्युकेशन इन्स्टिटयूटतर्फे दरवर्षी देण्यात येणारा अक्षय्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर करण्यात आला आहे. बिटको बॉइज हायस्कूलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी ही माहिती दिली. दि.न्यू .एज्युकेशन सोसायटीतर्फे2016 पासून अक्षय्य पुरस्कार देण्यात येतो. सोमवारी दिनांक 30 रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे दुपारी साडेचार वाजता हा सोहळा होणार आहे. 25 हजार रुपये रोख,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर प्रशांत दामले यांची सुधीर गाडगीळ यांची प्रकट मुलाखत घेणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. विकास आमटे, भारती आमटे, कविता राऊत, राज्याचे माजी मुख्य सचिन द..म. सुकथनकर,पद्मश्री ह्दयनाथ मंगेशकर,सचिन पिळगावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. रंगभूमीवरील कारकीर्दीबद्दल दामले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…