राज ठाकरे उद्याच्या आंदोलनावर ठाम

मुंबई : ज्या मशिदींवर भोंगे वाजतील त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचा आदेश आपण हिंदु बांधवांना दिला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन राज ठाकरे यांनी उद्या होणार्‍या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात ते म्हणतात,
मशिदीवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारातला. प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत आहे. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोग्यांच्या आवाजामुळे होणाया त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेले आहे की रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल. ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे- लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी 10 डेसिबल आणि जास्तीतजास्त 45 ते 55 डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या, 10 डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि 55 डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज,
प्रश्न असा आहे की, सर्व भोगे हे अनधिकृत आहेत. भोगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदीवरील भोग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाया ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसत? म्हणूनच आमचे मुस्लिम धर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे. हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर दिले जाईल. देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *