नाशिक

औद्योगिक वीजप्रश्नी दहा कोटींची तरतूद

जिल्हाधिकारी : जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र समिती कार्यरत असून, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लव्हाटे, ‘आयमा’चे अध्यक्ष आशिष नहार तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. विविध परवानग्या, दाखले आणि प्रशासकीय प्रक्रियांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा. कोणत्याही उद्योजकाला विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य नियमानुसार करण्यात येईल. उद्योजकांच्या तक्रारींवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर उभारणीसाठी सुमारे 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहितीही
त्यांनी दिली.
तालुकास्तरावरही उद्योग मित्र समितीच्या बैठका आयोजित करून स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडविण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. महावितरणकडून सुरू असलेल्या कामांचा स्वतंत्र आढावा घेऊन उद्योजकांच्या वीजविषयक समस्या मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
बैठकीत उद्योजक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी वीज, रस्ते, गटारी, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडले. तसेच उद्योग विकासासाठी काही महत्त्वपूर्ण सूचनाही प्रशासनासमोर ठेवल्या.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य
‘आपले सरकार’ं पोर्टलच्या वापरावर भर
उद्योगांना आवश्यक परवानग्या व सेवांसाठी प्रशासनाचे सहकार्य
औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्स्फॉर्मरसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद
तालुकास्तरावर उद्योग मित्र समितीच्या बैठका आयोजित करणार
महावितरणच्या कामांचा स्वतंत्र आढावा
वीज, रस्ते, गटारी व सुरक्षिततेच्या प्रश्नांवर विशेष लक्ष
उद्योजकांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आश्वासन

 

Allocation of ₹10 crore for industrial power issues

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago