सिंहस्थासाठी खरेदी, अठरा कोटींचा खर्च
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमनच्या ताफ्यात 18 कोटी 30 लाखांंची बारा नवीन वाहने दाखल होणार आहेत. पुण्याच्या हायटेक कंपनीकडून अग्निशमनची वाहने खरेदी केली जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये वाहने शहरात दाखल होणार आहेत. दरम्यान, सद्यस्थित अग्निशमन विभागातील 37 पैकी तब्बल 15 वाहने कालबाह्य झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
सिंहस्थकाळात कोट्यवधी भाविक नाशिक शहरात असणार आहेत. अशावेळी कुठेही आगीसारखी दुर्घटना घडू नये, याकरिता अग्निशमनकडून अत्याधुनिक वाहनांसाठी तीन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवली होती. सद्यस्थित अग्निशमनकडे असलेली वाहने कालबाह्य झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सिंहस्थात अग्निशमनला नवीन वाहने घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार अग्निशमनकडून नऊ मोठी व तीन छोटी अशी एकूण बारा वाहने खरेदीचा निर्णय घेतला आहे. नाशिकचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने आगीच्या घटना घडल्यास जीवितहानीसह आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अत्याधुनिक वाहनांसह सज्ज असायला हवे. हे लक्षात घेऊनच अठरा कोटींची वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.
रॅपिड इंटरव्हेंशन व्हेइकलद्वारे गल्लीतल्याही आगीवर नियंत्रण
शहरातल्या विविध भागांत गल्लीबोळात आग लागल्यास अशावेळी मनपाच्या अग्निशमनकडे मोठीच वाहने असल्याने आग नियंत्रणासाठी अडचणी येऊन आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र होते. परंतु, महापालिकेच्या ताफ्यात तीन रॅपिड इंटरव्हेंशन व्हेइकल ही छोटी वाहने दाखल होणार असल्याने आता गल्लीबोळात आग लागल्यास या अत्याधुनिक वाहनाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.
ऑक्टोबरमध्ये एकूण बारा वाहने येणार असून, या वाहनांची मदत भविष्यात होणार आहे. काही महिन्यांवर होत असलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ही वाहने घेण्यात आली आहेत.
– संजय बैरागी, अग्निशमन अधिकारी, मनपा
Twelve new vehicles added to the fire department’s fleet.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…