नाशिक

कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी 289 कोटींची तरतूद प्रस्तावित

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने वेग घेतला असून, तपोवनातील साधुग्राम उभारणीसाठी प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. साधू-महंतांच्या निवासासाठी आवश्यक असलेल्या जमिनी कायमस्वरूपी संपादित न करता तात्पुरत्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. यासाठी तब्बल 289 कोटी 8 लाख 20 हजार 738 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. अपर तहसीलदार कार्यालयाने हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. निधी मंजुरीनंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.
साधुग्रामसाठी नाशिक शहर-2, नांदूर, दसक आणि आगर टाकळी या तीन गावांतील जमिनींची आवश्यकता आहे. महानगरपालिकेच्या नगररचना व भूसंपादन विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे. त्यानुसार अपर तहसीलदार कार्यालयामार्फत जमीनधारकांना द्यावयाच्या भाडे मोबदल्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार तिन्ही गावांतील जमिनींसाठी 262 कोटी 80 लाख 18 हजार 853 रुपये भाडे मोबदला द्यावा लागणार आहे.
याशिवाय भूसंपादन प्रक्रियेवरील प्रशासकीय खर्चासाठी 10 टक्के रक्कम म्हणजेच 26 कोटी 28 लाख 1 हजार 885 रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण निधीची मागणी 289 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

असा मिळणार मोबदला
गावनिहाय मोबदल्याचा विचार करता नाशिक शहर-2 येथील जमिनींसाठी सर्वाधिक 136 कोटी 13 लाख रुपये, नांदूर, दसकसाठी 64 कोटी 6 लाख रुपये, तर आगर टाकळीसाठी 62 कोटी 60 लाख रुपये मोबदला निश्चित करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामची उभारणी महत्त्वाची मानली जात आहे. लाखो साधू-महंतांच्या निवासासह विविध सोयीसुविधांसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे जमीनधारकांना वेळेत मोबदला देऊन भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. आता जिल्हाधिकार्‍यांकडून निधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

 

Allocation of ₹289 crore proposed for ‘Sadhugram’ at the Kumbh Mela

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

10 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

10 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

10 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

10 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

10 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

10 hours ago