नाशिक

शहरात पहिल्याच दिवशी 123 होर्डिर्ंग्ज जप्त

अनधिकृत होर्डिर्ंग्जविरोधातील मोहिमेला सुरवात

नाशिक : प्रतिनिधी
शहरात सर्रास विनापरवानगी होडिर्ंग्ज लावून परिसर विद्रूप करणार्‍यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवार(दि. 16) पासून मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी 123 होर्डिंग्ज जप्त केले आहेत. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभागानेे म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात दिवाळीनिमित्तासह वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देणार्‍या बॅनरची जत्रा भरल्याचे चित्र होते. होर्डिंग्ज, बॅनर व फ्लेक्स असे एकूण 123 प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दिवाळी संपताच महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर होर्डिंग्ज लावले जात असल्याने याचा वाहनधारकांना फटका बसतो आहे. अनेक ठिकाणी अपघात होण्याची भीती असते. प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती. अखेर अतिक्रमण विभागाने सोमवारी नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर-सिडको या सहा विभागांत पथकाद्वारे होडिर्ंग्ज हटवले.

विभागानुसार केलेली कारवाई
विभाग             होडिर्ंग्ज         बॅनर        फ्लेक्स
नाशिकरोड          08               03           07
नाशिक पूर्व          13               12            03
नाशिक पश्चिम    10              02           06
नवीन नाशिक      09             03            04
सातपूर                14              02           04
पंचवटी                12              03           08
एकूण                                   123

 

अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील मोहिमेला सुरवात केली असून, यापुढेही ती चालूच राहील. शहरात कोणीही परवानगी न घेता होर्डिंग्ज लावण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्यांच्याविरोधात कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल.
– सुवर्णा दखणे, उपायुक्त अतिक्रमण, मनपा

123 hoardings seized in the city on the very first day

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

9 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

10 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

10 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

10 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

10 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

10 hours ago