नाशिक

हलव्यासह फुलांच्या दागिन्यांचीही क्रेझ

 

नाशिक ः प्रतिनिधी

संक्रातीला आवर्जुन काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा असून, यंदा हलव्याच्या दागिन्यांसह फुलांच्या दागिन्यांचीही क्रेझ असल्याने मागणीत वाढ झाली आहे. काळ्या रंगाच्या कपड्यांवर हलव्याचे दागिने आणि फुलांची  ज्वेलरी खुलून दिसते. त्यामुळे महिलांवर्गाची पसंती मिळत आहे.

भावी वधूवरांसाठी, नववधू तसेच लहान बाळांच्या पहिल्या संक्रातीला काळ्या रंगाचे कपडे,हलव्याचे दागिने,तिळगुळ आदी आवर्जून भेट म्हणून दिले जातात.त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांना गेल्या काही वर्षात मागणी वाढली आहे.

राज्यभरात हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. शहरातील विविध भागात हलव्याचे दागिने बनविले जातात. अनेक दुकानांमध्ये दागिने ऑडर देऊन बनवून घेतले जातात. रेडीमेड दागिन्यांनाही पसंती मिळते.

हलव्याच्या दागिने तीळ,काटेरी हलवा यांच्या पासून पाकात बनविले जातात.नथ,राणीहार,कानातले,बाजूबंद,बांगड्या,मंगळसूत्र,तोडे,कमरपट्टा आदी दागिने बनविले जातात.ङ्गुलांची ज्वेलरी कृत्रीम ङ्गुले,मोती,चमकी,खड्यांची लेस,वेलवेट कापड आदींपासून बनविले जातात.

संक्रातीचा सण भावी वधू,नववधू,लहानबाळांसाठी खास असल्याने आवर्जून भेट देण्यात येते.लहानमुलांसाठी बासरी,मुकुट,बाजूबंद,कमरपट्टा,तोडे आदी बनविण्यात येतात.संक्रातीला लहानमुलांचे बोरन्हान केले जाते.त्यासाठी आवर्जून हलव्याचे दागिने खरेदी केले जातात.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

21 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

21 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

21 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

21 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

22 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

22 hours ago