अंबडला हॉटेल चालकासह कर्मचाऱ्यांना टवाळखोरांनी केली मारहाण,वेटर गंभीर जखमी ,घटनेचा सीसीटीव्ही वायरल,
सिडको विशेष प्रतिनिधी :-अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नम्रता पेट्रोल पंपाजवळुुन अंबड गावाकडे जाणाऱ्या मुख्य रोडवरील हॉटेल महाराजांमध्ये रात्री उशिरा दारू न दिल्याने सहा ते आठ टवाळखोरांनी हॉटेल बार मालकासह येथील काम करणाऱ्या चार ते पाच कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी घडली टवाळखोरांनी केलेल्या या मारहाणीत हॉटेलमधील वेटर जखमी झाला असून याच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे दिवसभर सोशल मीडियावर हा व्हिडिओ पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दिवसेंदिवस गुन्हेगारांचा वाढता वावर व टवाळखोरांची दहशत यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेत एका राजकीय पदाधिकाऱ्याने दबाव तंत्र आणले असल्याची चर्चा आहे. यामुळे पोलीस ठाण्यात या घटने प्रकरणी गंभीर गुन्हा नोंद झाला नसल्याचे फिर्यादी भागिनाथ भास्कर लोखंडे वय ३२, मुळगाव कन्नड छत्रपती संभाजीनगर) यांचे म्हणणे आहे. एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी बार मालकास व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गणेश आहेर (२६) मनीष हिवाळे (२६) विवेक वाघ (२५) सागर बाविस्कर (२४) निखिल खैरनार (२३) गणेश आहेर, संजोग देसाई हे सर्व राहणार अंबड सिडको येथील आहे. या संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे. यातील दोन संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती एमआयडीसी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांनी दिली आहे.
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…