महाराष्ट्र

अनाधिकृत विना परवाना खतांच्या साठ्यावर कृषी विभागाची कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांकडून विविध खतांच्या ग्रेडचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अशावेळी अधिकृत खत विक्रेते यांचे मार्फत शेतकऱ्यांना अनाधिकृत व विना परवाना कमी दरात बनावट द्रवरूप  खते उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून धुळे तालुक्यातील मे.धनदाई अॅग्रो एजन्सी,बेहेड या खत विक्रेत्याकडे मे.एग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.सातपुर , नाशिक यांनी उत्पादीत केलेली द्रवरुप खते पाच लिटर कॅनमधील साठा कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने जप्त केला .
विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या  आदेशानुसार तसेच धुळे येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शांताराम मालपुरे, धुळे, नाशिक विभागाचे
तंत्र अधिकारी (गु.नि) संजय शेवाळे यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे, मोहीम अधिकारी, प्रदिप निकम,
कृषि अधिकारी,पं.स. अभय कोर, कृषी अधिकारी
रमेश नेतनराव यांच्या सहकार्याने विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,नितेंद्र पानपाटील यांनी ही  कारवाई केली आहे. यावेळी पथकाने अनाधिकृत व विना परवाना खतांचा ६० लिटर साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य सुमारे १८ हजार एवढे आहे. संशयित विनोद जयाजी तोरवणे, प्रोपरायटर,मे.धनदाई अॅग्रो एजन्सी,बेहेड ता.साक्री व मे.एग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.सातपुर , नाशिक विरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ , अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी आवाहन केले आहे की, शेतकरी बांधवांनी अनाधिकृत व विना परवाना खते खरेदी करू नयेत तसेच खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून पक्की पावती घेऊन खरेदी करावीत. कुठेही अनधिकृत आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ कृषी विभागाला द्यावी.
Bhagwat Udavant

Recent Posts

संडे अँकर : तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका

  संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…

1 hour ago

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

3 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago