नाशिक

टोमॅटो पिकाला चिरा; खर्चही निघेना

अवकाळीमुळे शेतकरी हतबल; आर्थिक गणित बिघडले

अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी पडलेल्या बेमोसमी पावसामुळे टोमॅटो पिकाला चिरा पडल्यामुळे शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. नीचांकी बाजारभावामुळे शेतकर्‍याचे आर्थिक स्रोत बिघडले.
शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आह. मोठा खर्च करून पिकविलेला टोमॅटोे जनावरांचे खाद्य बनले आहे.
खते, बी- बियाणे, औषधे महाग झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यानी शेतीत काय नियोजन करायचे कोणते पीक घ्यायचे? या संभ्रमात शेतकरी सापडला आहे. टोमॅटोला एका बिघ्याला एक लाख खर्च येतो. बांबू, तारी, खते, औषधे, तणनाशक, टॉनिक आदी घ्यावे लागतात. रोपे नर्सरीतून एक रुपया 40 पैसे काडीप्रमाणे शेतकरी आणतात, त्याचे संवर्धन करून तारी बांधणी मजूर व शेतमजुरी 15 रुपये जाळीप्रमाणे खुडतात. मशागत सुतळी, तार बांबू आदींसाठी खर्च येतो. शासनाने दखल घ्यावी, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

शेतीस लागणारे उपयुक्त खते ड्रीप, पाइप, औषधे बी-बियाणे सर्व महाग झाल्यामुळे शेती ना परवडणारी झाली. त्यात वातावरणाचा परिणाम, शेतकरी पूर्ण मोडकळीस आलेला आहे. शासनाने शेतकर्‍यांसाठी काहीतरी चांगली उपाययोजना आखावी शेतकरी जर संपला, तर सर्वच संपुष्टात येईल.
– नंदू सहाणे, शेतकरी, साकूर

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago