सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांचे निधन
नाशिक: प्रतिनिधी
सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे या वर्षीचे अध्यक्ष आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अनिल गडाख यांचे हृदय विकाराने निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. आज दुपारी जेवण झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने अशोकनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. इलेक्ट्रिकल ठेकेदार असलेलं गडाख हे मूळचे सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील रहिवासी होते. नाशिकला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी अल्पावधीत कामाचा ठसा उमटवला. महावितरण कंपनीचे ठेकेदार म्हणून ते काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाचे असलेल्या गडाख यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.