दहा हजाराची लाच घेताना वणीच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

दहा हजाराची लाच घेताना वणीच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

दिंडोरी : प्रतिनिधी

शेतजमीनीवर कर्ज काढण्यासाठी शेतजमीनीच्या नोंदी फेरफार करुन देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असुन त्यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राप्त माहीती अशी , तक्रारदार यांचे मालकीची कसबे वणी ,ता.दिंडोरी येथे गट क्रमांक 617 ही शेतजमीन असुन त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे रा,ध्रुवनगर ,मोतीवाला मेडीकल काॕलेजसमोर रेणुका हाईट्स प्लॕट नंबर 9,सातपुर नाशिक यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळणेबाबत विनंती करुन फेरफार नोंदीची मागणी केली.तेव्हा सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारदारास सांगितले .त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या मात्र सध्याच्या तीन नोंदी वणी येथील तलाठी यांचेकडे मिळतील असे सांगीतले.तक्रारदार यांनी पुन्हा गांगुर्डे यांची भेट घेतली त्यावैळी नंबर 617 चे उतार्यावरील शेतजमीन आकारा बाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असुन त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली.परंतु तक्रारदार यांचा यास विरोध असल्याने त्यानी दिनांक 25/9/2024 रोजी गांगुर्डे यांनी शासकीय पंच साक्षिदार यांचे समक्ष 10 हजाराच्या लाचेची मागणी केली व दिनांक 26/9/2024 रोजी गांगुर्डे यांनी त्यांचे शासकीय कार्यालयात पंच साक्षीदारासमोर दहा हजार रुपये रोख स्वरुपात लाच स्वीकारली .लाच स्वीकारताच पोलिस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पथक यांनी गांगुर्डे यांना रंगेहाथ पकडले.त्यांचे विरोधात वणी पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व रकमेची हॕश व्हॕल्यु घेण्यात आली आहे सदरची कारवाई पोलिस अधिक्षक शर्मीष्ठा वालावलकर , अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी वाचक स्वप्नील राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील ,पोलिस नाईक विनोद चौधरी,पोलिस शिपाई अनिल गांगोडे ,चालक पोलिस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावुन केली आहे.दरम्यान या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसुल विभागात खळबळ उडाली असुन सदर कारवाईबाबत त्रस्त शेतकरी व नागरीक यांचेकडुन स्वागत करण्यात आले असुन सदर संशयीत यांचे उत्पन्नाचे स्त्रोत तपासावे अशी मागणी होत असुन शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *