सिन्नर:
सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथील शेतातजनावरांना चारा म्हणून  साठवून
ठेवलेला सोयाबीनचा भुसा वीज पडून लागलेल्या आगीत खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.
दुसंगवाडी शिवारात गट नंबर 139 मध्ये सेवानिवृत्त शिक्षक दगडू बाबुराव ढमाले यांचे शेत आहे.  भागात वादळ सुरू होते. यादरम्यान आकाशात विजा देखील कडाडत होत्या. एक वाजेच्या सुमारास वीज पडल्याचा आवाज होऊन श्री ढमाले यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या भुसाच्या गंजीने अचानक पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. वादळात आग विझविण्यासाठी कोणी पुढे झाले नाही, शिवाय परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.  सिन्नर येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलास मदतीची विनंती केली. सिन्नर येथून आलेल्या बंबाने आग विझवली. मात्र तोपर्यंत चारा, बांबूचा ढिगारा, ड्रीपच्या नळ्या जाळून खाक झाल्या होत्या. या घटनेत श्री ढमाले यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

8 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

15 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago