सातपूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना आज सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने अंजेनरी येथून
अटक केली असून, त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर अंकुश पवार हे फरार होते. पवार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके दोन दिवसांपासून तैनात होती; मात्र पवार हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते.आज सकाळी पवार हे अंजनेरी येथे असल्याची खबर पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पवार यांना अटक केली आहे.