ऊसतोड कामगारांचा आयशर ट्रक उलटला;25 पेक्षा जास्त मजूर जखमी

मनमाड विशेष प्रतिनिधी

नांदगाव-चाळीसगाव मार्गावर ऊसतोड कामगारांना घेवून जाणारा आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात सुमारे 25 पेक्षा जात मजूर जखमी झाले आहे.त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून जखमी मध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.काही जखमींना नांदगावच्या तर काहींना चाळीसगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सर्व मजूर घडली भिमाशंकर येथील साखर कारखान्यावरून आपल्या घरी चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथे जात असतांना नांदगावच्या डॉक्टरवाडी शिवारात हा अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे आयशर ट्रक पलटी झाल्याचे बोलले जात आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

रुग्णालयात दाखल केलेले अपघात ग्रस्त

पहा व्हिडिओ

https://youtu.be/131rbzqBBc4

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *