नाशिकरोड: विशेष प्रतिनिधी
वडनेर दुमाला येथे चार दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद झाला. या भागात वन विभागाने तब्बल पंधरा पिंजरे लावले आहेत. त्यातून जयभवानीनगर येथील बाळासाहेब जाधव यांच्या पेरूच्या बागेत लावलेल्या
पिंजर्यात सोमवारी बिबट्या अडकला.
वन अधिकारी सुमित निर्मळ, अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील, अंबादास जगताप, दर्शन देवरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेतला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमालातील साडेतीन वर्षांचा आयुष भगत याला दारातून बिबट्याने उचलून नेऊन त्याचा बळी घेतला होता. या घटनेने जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधीनी वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
वन विभागाने या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह पंधरा पिंजरे लावले आहेत. चार दिवसांपूर्वी एक बिबट्या उसाच्या शेतात जाळे टाकून व इंजेक्शन देऊन पकडण्यात आला होता. सोमवारी दुसरा पकडण्यात आला. मात्र, अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी बिबट्या पिंजर्यात अडकलेला निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्र हलविण्यात आले. या भागात अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
वडनेर दुमाला पाठोपाठ आता पिंपळगाव खांब शिवारात मुक्त संचार करणारा बिबट्या पकडण्यात आला. तरीही
शेतकर्यांनी परिसरात शेतीच्या कामासाठी जाताना सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, रात्री विनाकारण बाहेर पडू नये, अशा सूचना वनाधिकारी सुमित निर्मळ यांनी दिल्या.
पिंपळगाव खांब, विहितगाव, वडनेर, जयभवानी रोड, देवळालीगाव, पाथर्डी, दाढेगाव आदी मळे विभागात सुमारे वीस बिबटे आहेत. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यक्षमपणे काम करत आहेत. नागरिक वन विभागाला रात्री-अपरात्री मदत करत आहेत. बिबट्यांचा प्रश्न लवकरच निकाली निघेल. आयुष भगत याच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी आशा आहे.
– जगदीश पवार, माजी नगरसेवक
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…