आठ वर्षांपासून फरार ‘खलनायक’ला अटक

गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
निकम गँग व उघडे गँग यांच्यातील वर्चस्ववादातून 18 मे 2017 रोजी नवनाथनगर, पंचवटी, नाशिक येथे किरण राहुल निकम याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेला विकास ऊर्फ विक्की पंजाबी याला अखेर अटक करण्यात आली आहे. गुंडाविरोधी पथकाने हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागातून त्याला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील अन्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली असताना, मुख्य आरोपी विक्की पंजाबी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी गुंडाविरोधी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी तपासाची दिशा ठरवली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चंदीगड येथे व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपी विकास ऊर्फ विक्की पंजाबी हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पुलगा गावात वास्तव्यास असल्याचे समोर आले. गुंडाविरोधी पथकाचे पथक कुल्लू येथे रवाना झाले. 23 ऑगस्ट 2025 रोजी रात्री पुलगा परिसरातील हॉटेल्स आणि घरे तपासल्यानंतर पहाटे चार वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला कुल्लू येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास नाशिकमध्ये आणण्यात आले आहे. तपास पंचवटी पोलीस ठाणे करत आहे. या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव,
घनःश्याम महाले आणि दयानंद सोनवणे यांनी सहभाग घेतला.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago