हातमाग व वस्त्रोद्योग पदविकेसाठी १० जून पर्यंत करावेत अर्ज

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी १० जून पर्यंत करावेत अर्ज :शीतल तेली
नाशिक : प्रतिनिधी
 केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 10 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी  कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत १० जून २०२२ पर्यंत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.
उमेदवारांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना  www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध करूनदेण्यात आला असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली यांनीदिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *