यूथ फेस्टिव्हल मैदानात झाला कृषी मेळावा
नाशिक : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवात काल तिसर्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 1550 युवकांनी सहभागी होऊन मुलाखती दिल्या, तर त्यापैकी 110 जणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरीचे नियुक्तीपत्र आबासाहेब व चंद्रकांतदादा मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यूथ फेस्टिव्हल मैदानात 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या जागतिक कृषी मेळाव्यात काल सकाळी चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे, अजय बोरस्ते, विशाल संगमनेरे, निरंजन मोहिते, आशिष राऊत यांच्या हस्ते दीपपूजन करून रोजगार मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यभरातून नोकरीसाठी इच्छुक तरुण, तरुणी व त्यांचे पालक यांनी मुख्य सभामंडपात गर्दी केली होती. चंद्रकांत मोरे यांनी यानिमित्त सांगितलं की, श्री स्वामी समर्थ सेवामार्ग समाजासाठी उपयुक्त असे विविध उपक्रम राबवित असून, बेरोजगार युवकांना अपेक्षित रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, आजचा रोजगार मेळावा या हेतूनेच आयोजित केला आहे. इच्छुकांनी समर्थ केंद्राच्या संपर्कात राहून विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा. आजच्या मेळाव्यात एडिमॅक्स, श्रीपाद, बा. व्ही.जी., बॉश, एलआयसी, महेंद्र, एचडीएफसी, कोटक, टाटा, एसबीआय, सिन्युमेरो, निलाचल, बजाज, सीटीआर अशा विविध 60 कंपनी, बँकांनी सहभागी होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नियुक्ती दिली तर काही उमेदवारांना पुढील मुलाखतीसाठी पुन्हा बोलावण्यात येईल, असे सांगितले.
Appointment letters to 110 people at the employment fair
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…