मान्सून विशेष कार्य पथकाची नियुक्ती

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचा निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मान्सून विशेष कार्य पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार या पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. सहा विभागांमध्ये या पथकाची नियुक्ती केली जाणार असून, विभागीय अधिकारी व उपअभियंता यांच्यासह वीस जणांंचा पथकात समावेश असेल. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी विविध प्रतिबंधात्मक व दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र, अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी स्थिती उद्भवू नये, याकरिता मान्सून विशेष कार्य पथकाद्वारे शहरात कार्यवाही केली जाणार आहे.
या पथकाद्वारे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी न साचणे, पूरस्थिती न उद्भवणे, झाडे तसेच झाडाच्या फांद्या पडल्यामुळे जीवित व वित्तहानी न होणे आदी प्रकारांना आळा घातला जाईल. सध्या या पथकाच्या नियुक्तीची कार्यवाही सुरू असून, लवकरच सहा विभागांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. पथकात बांधकाम, घनकचरा, ड्रेनेज, आरोग्य, अतिक्रमण, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी असणार आहेत. मनपा पावसाळ्यापूर्वी दरवर्षी विविध प्रतिबंधात्मक व दुरुस्तीची कामे करते. पावसाचे पाणी रस्त्यावर न साचणे, पूरस्थिती न उद्भवणे, फांद्या पडल्यामुळे जीवित व वित्तहानी न होणे, रोगराई न पसरणे, हा या पथकाचा उद्देश असेल. नाले व गटार स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती (खड्डे बुजविणे, खराब रस्ते दुरुस्त करणे), पावसाच्या पाण्याचा निचरा, झाडांची छाटणी, साथीच्या आजारांसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करून जबाबदार्‍या पार पाडणे गरजेचे आहे. ही जबाबदारी पथकावर असणार आहे. याअनुषंगाने बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, घनकचरा विभागातील कर्मचार्‍यांनी समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याकरिता पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असणारी कामे करणे, त्यासाठी लागणारी मशिनरी बांधकाम विभागाने उपलब्ध करून द्यावी. गटारींची स्वच्छता, साफसफाई करणे, पावसाचे पाणी साचणार्‍या क्रॉनिक फ्लडिंग स्पॉट्स ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही करावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत राहील, याबाबत नियोजन केले जाईल.
दरम्यान, रस्त्यांबाबत एमएनजीएल, ओएफसी, एमएससीडीसीएल, दूरसंचार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, फोडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण याकडे लक्ष असेल. रस्त्यांत,
फूटपाथवर साचलेला कचरा ड्रेनेज लाइनमध्ये अडकणार नाही, याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

जेसीबीसह क्रेनची मदत
या कार्यवाहीसाठी प्रत्येक विभागातील पथकासाठी अतिकमण विभागातील ठेकेदाराकडील दोन जेसीबी तसेच आवश्यकतेनुसार टिप्पर क्रेन उपलब्ध करून दिली जाईल.

Appointment of Monsoon Special Task Force

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *