एकलहरेतील मातोश्री फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे कौतुक
येवला : प्रतिनिधी
विविध आजार वाढले, त्यावरील उपायही वाढले आहेत. एकाच आजारावर शेकडो प्रकारची औषधे उपलब्ध असल्याने नागरिकांना त्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकताही असते. हीच गरज ओळखून एकलहरे येथील मातोश्री फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी इंटरॅकमेड अॅप तयार केले असून, नागरिकांना गोळ्या, औषधांचा उपयोग व दुष्परिणाम समजू शकणार आहे.
नागरिकांना आपल्या आजारांवरील विविध प्रकारचे औषधे व त्यासोबत घेतला जाणारा विरुद्ध आहार, त्यापासून होणारे चांगले व वाईट परिणाम याविषयी हे अॅप माहिती देणार आहे. ज्यांना औषधांबद्दल किंचितही माहिती नसते, ते या अॅपद्वारे जागरूक होऊ शकतात. हा विषय आयुष्मान भारत योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे, ज्यामध्ये डिजिटल हेल्थ आणि टेलिमेडिसिनद्वारे दिल्या जाणार्या आरोग्यसेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे. औषधांच्या चुकीच्या सवयी व एकत्र वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे अॅप उपयोगी ठरू शकते. इंटरॅकमेड अॅपमध्ये 33 प्रमुख औषधांची माहिती, भारतीय ब्रँड व 500 हून अधिक परस्परसंवाद, तीव्रता, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्पष्टीकरणांंचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सी.एनएसपीएल.स्पेस या लिंकवर हे अॅप उपलब्ध आहे. सामान्य वापरकर्त्यांसाठी सुलभ, इंटरफेस आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणाली यामुळे हे अॅप वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त साधन ठरणार आहे.
या अभिनव उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली आयेशा आलम, तृप्ती आहेर, सोनाली आघाव, गायत्री आहिरे यांनी संयुक्तपणे हे अॅप विकसित केले. या अॅपचे महाविद्यालयात सादरीकरण झाले. यासाठी या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करून या नावीन्यपूर्ण अॅपला पसंती मिळाली. अंतिम वर्षातील या विद्यार्थिनींनी केलेले हे संशोधन कौतुकास पात्र असून, भविष्यात इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरेल, असे संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांनी सांगितले. संस्थाध्यक्ष तथा शिक्षक आमदार किशोर दराडे, संचालक रामदास दराडे, रूपेश दराडे आदींनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले.
मातोश्री फार्मसी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना
स्पर्धेच्या युगात स्वतःला सक्षम बनविण्यासाठी मार्गदर्शन करते. महाविद्यालयात विविध तज्ज्ञांची व्याख्याने, फार्मसी कंपन्यांना भेट तसेच कॅम्पस मुलाखतीचेही आयोजन केले जाते. या विद्यार्थिनींनी कौशल्यपूर्वक तयार केलेल्या या अॅपमुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. लवकरच प्ले स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध होईल.
– डॉ. गोकुळ तळेले, प्राचार्य, मातोश्री फार्मसी, एकलहरे
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…