राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विकास प्रकल्पांसह पायाभूत सुविधा, सिंचन, क्रीडा, पुनर्वसन, वित्तीय सुधारणा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणापासून ते जायकवाडी प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुलाच्या विकास आराखड्यातील 3 हजार 993 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना गती मिळणार आहे. पंढरपूरचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची वाढती संख्या, स्थानिक परिस्थिती आणि प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष पॅकेज तयार करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागात ट्रेड्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कंत्राटदारांची प्रलंबितदेयके वेळेत देणे अधिक सुलभ होणार आहे.
Approval for Pandharpur’s special rehabilitation policy