प्ले स्टोअरवरून हटवण्यात येणार जवळपास नऊ लाख ऍप्स

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी गुगलने काही ऍप्सवर बंदी घातली होती. आता गुगल जवळपास 9 लाख ऍप्स काढून टाकण्याचा विचार करत आहे. यापैकी काही ऍप्स तुम्ही डाउनलोड केलेले असतील. त्यामुळे थोडं सावध राहा, कारण युजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनीला असा निर्णय घ्यावा लागला आहे. आज आपण गुगलच्या

या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. जे ऍप्स त्यांचे अपडेट्स जाहीर करत नाहीत, अशा 9 लाख ऍप्सना गुगल, प्ले स्टोरवरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, असे केल्याने गुगल ऍप स्टोअरवरील ऍप्सची संख्या एक तृतीयांश कमी होईल. यापूर्वी, ऍपलने देखील आपल्या प्ले स्टोरवरून असे ऍप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, ज्यांनी गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही अपडेट जारी केले नव्हते. ऍपलनेही त्या सर्व ऍप निर्मात्यांना ईमेल पाठवून याची माहिती दिली होती. सिनेटच्या म्हणण्यानुसार, गुगल आणि ऍपल त्यांच्या वापरकर्त्यांच्या संरक्षणासाठी ही पावले उचलत आहेत. गुगल ते ऍप्स आपल्या प्लॅस्टोरवरून हाईड करेल, ज्यांचे अपडेट रिलीझ झालेले नाहीत. असे केल्याने, वापरकर्ते ते ऍप्स डाउनलोड करू शकणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *