नाशिक: प्रतिनिधी
सात बारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना आराई तालुका बागलाण येथील तलाठी चंपालाल सुरेश चव्हाण (40) रा. श्रीकृष्ण नगर, सटाणा यास नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार व त्याचा भाऊ यांचे नाव वाटणी करून दिली होती. हे कागदपत्रे तकरदार यांनी तलाठी चव्हाण यांच्याकडे दिले होते. हे नाव लावण्यासाठी तलाठी चव्हाण यांनी 20 हजार रुपये लाच मागितली होती. या बाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती त्यानुसार सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक गायत्री जाधव हवालदार पंकज पळशीकर, अजय गरुड, प्रकाश महाजन, ज्योती शार्दूल यांनी ही कामगिरी केली, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे. वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…