कृषी उद्योजकांचा शिल्पकार : भूषण निकम
भारत आपला कृषिप्रधान देश आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुजलाम राज्य आणि या महाराष्ट्रामध्ये शेती सोबतच अनेक जोडधंदे कृषी व्यवसाय नव्याने सुरू होत आहेत. कृषी उद्योग व विस्तार क्षेत्रामध्ये असेच एक नाव सातत्याने गेल्या 17 वर्षापासून काम करत आहे, ते नाव म्हणजे कृषिभुषण भूषण निकम.
भूषण निकम यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने खास त्यांच्यासोबत केलेली मुलाखत.
तुम्ही कृषी क्षेत्रात कसे आलेत ?
माझा नाशिक जिल्ह्यातील कळवण गावातून अत्यंत सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातून जन्म झाला.. गरिबी व शेतकऱ्याची परिस्थिती याचा जवळून अनुभव घेतला, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्यावर येत असलेले संकटे नित्याचेच.. बारावी पर्यंत कळवण येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगले काम करायचे या उद्देशाने कृषी पदवीचे शिक्षण परभणी विद्यापीठातून घेतले. अहमदाबाद येथुन एमबीए केले. 2008 मध्ये कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणतेही नोकरी मागे न लागता शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी ऍग्रोकेअर कृषीमंच या संस्थेची स्थापना करून कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराचे कार्य सुरू केले.. शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक उपक्रम, शेतीशाळा,कृषी प्रदर्शने, शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे, शेती विषयक मोफत मार्गदर्शन या विषयापासून कामाला सुरुवात केली.
कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना व युवकांना कोणत्या संधी आहेत ?
कृषी क्षेत्र हा खूप व्यापक विषय आहे, भारताची लोकसंख्या आज 144 करोड इतकी झाली आहे. म्हणजेच जगात आपण लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती आहोत. इतर देश भारताला सर्वात मोठा ग्राहक देश म्हणून बघतात.. परंतु 144 करोड लोकसंख्येला आवश्यक असलेले अन्नधान्य, शेतमाल हा आपला शेतकरी पिकवत आहे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. इतके मोठे बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहे. शेती करताना त्यासोबतच विविध कृषी जोडधंदे, प्रक्रिया उद्योग, कृषी निविष्ठा पुरवठा, आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधील बदल, विक्रमी उत्पादन, शेतमालाचं मूल्यवर्धन, शेतमालाची थेट बाजारपेठ सोबत जोडणे, विक्री व निर्यात यामध्ये प्रचंड मोठी संधी कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे.
*तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये सध्या काय काम करत आहेत व त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होत आहे. ?*
आम्ही कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत आहोत, त्यामध्ये आमची कृषी निविष्ठा म्हणजेच औषधे निर्मिती तयार करण्याची कंपनी तयार केली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही वाजवी दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देतो, शेतकऱ्यांना आवश्यक माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आमची आहे, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षण माफक दरात करून देतो, शेतमालावर प्रक्रिया व्यवसाय उभारता यावा यासाठी आम्ही व्हेजिटेबल डिहायड्रेशन युनिट सुरू केले आहे आणि त्या अंतर्गत विविध औषधी वनस्पतींवर आम्ही प्रक्रिया करून निर्यात करत आहोत. कृषी मासिक व अनेक कृषी विषयक पुस्तके सुद्धा आम्ही तयार करू शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. कांदा खरेदी विक्रीमध्ये आम्ही काम करतो, तसेच नाफेड या शासकीय संस्थेच्या अंतर्गत देखील कांदा खरेदी करत आहोत, कळवण उमराणा येथे आमचे कांद्याचे 12000 मेट्रिक टन साठवणूक शेड उभारलेले आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
*कृषी उद्योजकता निर्मितीसाठी आपण काय प्रयत्न करतात ?*
पाच वर्षांपूर्वी मी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली, त्यावेळेस फारसे या कंपनी विषयी आम्हालाही काही माहिती नव्हती परंतु आम्ही कंपनी तयार केल्यानंतर अनेक लोक हे आमच्या सोबत जुडत गेलेत आणि शेतकरी उत्पादक कंपनी विषयी माहिती विचारत गेलेत. आम्ही त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी कशी तयार करायची, त्याचे kव्यवस्थापन कसे करायचे याविषयी मार्गदर्शन करत गेलो आणि मागच्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये 600 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती आम्ही केली आहे. या कंपन्यांची फक्त नोंदणीच नाही तर कंपनी तयार झाल्यानंतर त्यांना बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, विविध शासनाच्या योजना, विविध लायसन्स, मार्केट जोडणे व व्यवसायाबद्दल चे सर्व मार्गदर्शन प्रशिक्षण देतो. आजवर 10,000 पेक्षा अधिक लोकांना आम्ही व्यावसायिक ट्रेनिंग दिली आहे. तर 2000 लोकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये अनेक कृषी व्यवसाय आमच्या माध्यमातून उभी राहत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.
*तुमच्या भविष्यात कृषी क्षेत्रासाठी काय योजना आहेत ?*
कृषी क्षेत्र भरपूर व्यापक आहे. त्यामुळे जितके काम केले ते कमीच पडणार आहे. परंतु तरीही कृषी क्षेत्रामध्ये नेहमी जास्तीत जास्त काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. साधारण संपूर्ण महाराष्ट्रात 3000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्यांची क्षमता विकास करायची आहे. स्वतःचा व्यवसाय त्यांना सुरू करून द्यायचा आहे. तसेच आम्ही नवीन ऍग्रो मॉल संकल्पना उभी करत आहोत त्या माध्यमातून देखील महाराष्ट्रभर त्याच्या आउटलेट उभे करायचे आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी एक ई-कॉमर्स पोर्टल उभे करायचे आहे. तसेच कांदा प्रक्रिया उद्योगांमध्ये देखील काम करण्याचा आमचा मानस आहे. 30000 मेट्रिक टन कांदा साठवणूक साठी व्यवस्था करत आहोत. 10000 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांच्या शेतमाल मूल्यसाखळी विकास उभी करायची आहे.
*तरुणांना व शेतकऱ्यांना तुम्ही कृषी व्यवसायात येण्यासाठी काय सांगाल..?*
आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावत आहे परंतु नोकऱ्या मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी पुरेसे वेतन मिळत नाही, त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषीविषयक शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता आपला ग्रामीण भागामध्येच कृषी विषयक स्वतःचा व्यवसाय उभा करावा, त्यातून स्वतःला व आपल्या गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. कृषी क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध झालेले आहेत. शासन देखील या सर्व गोष्टींना सहकार्य करत आहे. आपली स्वतःची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सर्व व्यवसाय हे आपल्या फक्त मानसिकतेवर अवलंबून असतात त्यामुळे आपण जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व तरुणांनी कृषी क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करावेत आणि यासाठी कोणतीही मदत लागत असेल तरी कृषीभूषण या फेडरेशनच्या अंतर्गत तुम्हाला सर्व मदत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू.
*तुमच्यासोबत शेतकऱ्यांना युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागेल?*
आम्ही व्यावसायिक ट्रेनिंग तसेच व्यवसाय सेटअप करून देतो. त्यासाठी आमच्या कृषीभूषण महा एफपीओ स्टार्ट अप फेडरेशन सोबत संपर्क करू शकतात. आमचे कार्यालय नाशिक व संभाजीनगर येथे आहे. आमचा संपर्क 7249398826 हा आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…