प्रतिमा

आर्थायटिसचे निदान वेळीच हवे

सांध्यांचा असा आजार ज्यात एक किंवा एकापेक्षा अधिक सांधे वेदनाग्रस्त होतात व त्यांना सूज येते.
आर्थायटिसचे अनेक प्रकार आहेत.
जसे ओस्टओ आर्थायटिस, संधिवात, गाउट, सोरायसिसमुळे होणारा आर्थायटिस वगैरे, त्यात ऑरिस्टो-आर्थायटिस हा प्रकार सर्वांत जास्त. आर्थायटिस हे जगभरात वृद्धापकाळातील अधुपणाचे व अपंगत्वाचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. वारंवार दवाखाना दौरे, रोजच्या जीवनातील कार्यक्षमता कमी होणे, सतत वेदनाशामक औषधी घेणे वगैरे हे आर्थायटिसने त्रस्त रुग्णाची सामान्य वैशिष्ट्ये आहेत. शरीरश्रम कमी होणे, त्यामुळे वजन वाढणे, मधुमेह होणे, पुढे हृदयरोग होणे, परिणामी रुग्णांचे नैराश्यग्रस्त होणे ही आर्थायटिसची अत्यंत वाईट परिणामे आहेत. म्हणूनच आर्थायटिसचे योग्य ते निदान व वेळीच उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आर्थायटिसचे निदान
डॉक्टरांकडून योग्य त्या वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्यास आर्थायटिसचे निदान करता येते. त्यासाठी काही रक्त-लघवीच्या तपासण्या आणि काही क्ष-किरणांच्या (एक्स-रे) तपासण्यांचा आधार घ्यावा लागतो. काही रुग्णांमध्ये संदेह असल्यास त्यांना संधिवाताचे निदान करण्यासाठी महत्त्वाच्या अशा आर.ए. फॅक्टर, ए.एस.ओ., अँटी सी.सी.पी. वगैरे चाचण्या कराव्या लागू शकतात व काही रुग्णांमध्ये चठख व उढ डलरप या तपासण्या पण उपयुक्त ठरू शकतात.
वेदना हे अतिसामान्य लक्षण आहे.
पण आर्थायटिसच्या प्रकारांनुसार वेदनादेखील भिन्न प्रकारच्या असतात. संधिवातामध्ये सकाळच्या वेळी थंड दमट वातावरणात जास्त वेदना होतात. शरीरात युरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात वाढल्यामुळे लहान सांध्यांच्या वेदना जास्त होतात. दीर्घकाळासाठी वेदना होतात वगैरे. ऑरिस्टो आर्थायटिसमध्ये कुठल्याही प्रकारच्या श्रमानंतर किंवा व्यायामानंतर सांधे जास्त दुखतात. ऑरिस्टो आर्थायटिस हा मुख्यतः उतरत्या वयाचा आजार आहे. तर संधिवात आणि गाउटमुळे होणार्‍या आर्थायटिसला कवी मर्यादा नसते. तसेच जिथे इतर प्रकारच्या आर्थायटिसमध्ये कधी कधी हलका ताप असतो, तिथे जंतुसंसर्ग झाल्यामुळे होणार्‍या आर्थायटिसमध्ये ताप जास्त प्रमाणात आणि जास्त कालावधीसाठी असतो. तरुणांमध्ये दिसणारा सिरो निगेटिव्ह स्पोडायलो आर्थापथी हा एकप्रकारचा महत्त्वाचा आर्थायटिस आहे. (या प्रकारात सांध्यांसोबत पाठीच्या मणक्यांची सूज होऊन ते हळूहळू झिजून जातात. अशा प्रकारे आर्थायटिसचे प्रकार भिन्न आहेत. पण सगळ्यांचे समान लक्षण मात्र वेदना हेच आहे. म्हणूनच आर्थायटिसच्या प्रकारांचे योग्य ते निदान होणे महत्त्वाचे आहे. निदान झाल्यास योग्य ती उपचार पद्धती असणेदेखील रुग्णांना फायदेशीर ठरू शकते.
उपचार पद्धती
1) औषधोपचार :
आर्थायटिसच्या उपचारांमध्ये बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा समावेश असतो. पेशंटला असणार्‍या आर्थायटिसच्या प्रकाराप्रमाणे औषधे दिले जातात. जसे संधिवाताच्या रुग्णांना वेदनाशामक औषधी देण्यात येतात. गाउटमुळे होणार्‍या आर्थायटिसमध्ये युरिक अ‍ॅसिड कमी करणार्‍या विशिष्ट प्रकारच्या गोळ्या देण्यात येतात. तर ऑरिस्टो आर्थायटिसमध्ये तीव्रतेप्रमाणे वेदनाशामक असे एनसेडच्या गोळ्या देण्यात येतात. तीव्रता जास्त असल्यास क्वचित स्टिरॉइड्सदेखील
देण्यात येतात.
2) थंड शेक :
सांध्याची सूज आणि स्नायूंची ताठरता कमी करण्यासाठी घरीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे थंड शेक घेणे
लाभदायक ठरते.
3) पट्टे किंवा ब्रेसेस :
सांध्यांना आधार मिळावा किंवा त्यांची हालचाल योगय ती व्हावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पट्टे किंवा ब्रेसेस घालणे गरजेचे असते. पण हे ब्रेसेस फक्त थोड्या कालावधीसाठीच वापरणे योग्य असते. दीर्घ काळात वापरण्यात आल्यामुळे ते सांध्यांभोवतीच्या स्नायूंना कमजोर बनवतात आणि हे भविष्यकाळात सांध्यांसाठी धोकादायक ठरू शकते. पट्टे किंवा ब्रेसेस हे विशेष करून गुडघ्यांच्या आजारात मदतगार साबीत होतात.
4) फिजिओथेरपी व व्यायाम :
आर्थायटिसमध्ये कधीतरी वेदना कमी करण्यास आणि सांध्यांसाठी योग्य ते व्यायाम मिळण्यास महत्त्वाची अशी फिजिओथेरपी करणे गरजेचे असते. तीव्रता जास्त असल्यास सांध्यांची सूज कमी करण्यासाठी लागणारे विशेष शेक पद्धती घेणे गरजेचे असते. एकदा सूज कमी झाल्यास रुग्णाने त्यांच्या दैनंदिन हालचालींव्यतिरिक्त कमीत कमी रोज 45 मिनिटे व्यायाम करणे महत्त्वाचे असते.
5) दैनंदिन जीवनातल्या पद्धतीत बदल :
बाकी उपचारांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते ते दैनंदिन जीवनातल्या पद्धतीत बदल. आपल्या सांध्यांना जपणे आणि त्यांच्यावर कमीत कमी भार देणे हे महत्त्वाचे. त्यात खाली मांडी घालून बसणे, सारख्या पायर्‍या वर-खाली करणे, गरजेपेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन फिरणे वगैरे हे सगळे टाळणे महत्त्वाचे असते. गरज असल्यास आणि डॉक्टरांनी सांगितल्यास चालताना काठी वापरणे योग्य असते. काठी वापरताना रुग्णाला वाटणार्‍या लाजेपेक्षा ती वापरताना रुग्णांना काठीमुळे त्यांचा सांध्यांचे झालेले संरक्षण ही भावना जास्त महत्त्वाची असते. शौचालयात कमोड बसवणे किंवा खुर्चीचा वापर करणे हे तितकेच महत्त्वाचे. शरीराचे वजन आटोक्यात असणेदेखील महत्त्वाचे. जास्त वजन म्हणजे सांध्यावर येणारा जास्त भार, दुखावलेल्या सांध्यावर असा भार देणे सांध्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असते.
6) सकारात्मक मानसिकता :
आर्थायटिसमध्ये जेवढी महत्त्वाची उपचार पद्धती आहे, तेवढीच महत्त्वाची असते रुग्णांची सकारात्मक मानसिकता. आपण सकारात्मक असाल तर लवकर बरे व्हाल आणि लवकर उपचार पद्धतीचा गुण लाभेल ही समज रुग्णाला असणे महत्त्वाची. स्वतःबद्दल चांगले आणि सकारात्मक मत असणे महत्त्वाचे. आर्थायटिसमुळे रुग्णाचे मनोबल ढासाळत असेल तर रुग्ण डिप्रेशनच्या अधीन जायची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून रुग्ण आणि त्यांच्या परिवारामध्ये आजाराशी लढण्याचे मनोबल असणे महत्त्वाचे. अशा भिन्न प्रकारच्या आर्थायटिस आणि त्याच्याशी लढा देण्यासाठी भिन्न प्रकारच्या उपचार पद्धती आज आपल्याकडे आहेत. आर्थायटिस होऊ नये म्हणून प्रयत्न करणे महत्त्वाचे. पण झाल्यास त्याची तीव्रता कमी ठेवणे आणि दैनंदिन जीवनात त्याचा कमीत कमी प्रभाव पडावा हे ध्येय ठेवणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.

Arthritis should be diagnosed on time.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago