प्रतिमा

लहानपणापासूनच दातांची काळजी घेणे आवश्यक

दात हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव आहेत. सुंदर हास्य, अन्न चावणे, स्पष्ट बोलणे आणि चेहर्‍याचे सौंदर्य टिकवण्यासाठी दातांची मोठी भूमिका असते. निरोगी दातांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसते. संपूर्ण आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पक्क्या दातांइतकेच दुधाच्या दातांचेही महत्त्व खूप असते. अनेक पालक दुधाचे दात पडणार आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात; परंतु दुधाचे दात मुलांच्या चेहर्‍याची ठेवण ठरवतात आणि पुढे येणार्‍या कायमस्वरूपी दातांना योग्य जागा मिळण्यास मदत करतात.
लहान मुलांनी दिवसातून दोन वेळा फ्लोराइडयुक्त पेस्टने दात घासावेत. चॉकलेट, बिस्कीट आणि गोड पदार्थांचे सेवन कमी करावे. लहान मुलांना चहा देणे टाळावे. त्यांच्या आहारात दूध, दही आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असावे, ज्यामुळे दात मजबूत राहतात. लहान मुलांना विहिरीचे किंवा जास्त क्षारयुक्त पाणी पिण्यास देऊ नये. अशा पाण्यामुळे दातांवर फ्लोरोसिस तयार होऊ शकतो, ज्यामुळे दातांवर पांढरे किंवा तपकिरी डाग पडतात.
लहान मुलांमध्ये अंगठा चोखणे, नख खाणे आणि ओठ चोखणे अशा सवयी असल्यास दात वेडेवाकडे येऊ शकतात. जबड्याची वाढ पूर्णपणे होत नाही. त्यामुळे या सवयी वेळेत बंद करणे आवश्यक आहे.
लहान मुलांचे दात जास्त किडू नयेत यासाठी दंतवैद्यांच्या सल्ल्याने फ्लोराइड अ‍ॅप्लिकेशन करता येते. यामुळे दात मजबूत राहतात आणि दात किडण्याचे प्रमाण कमी होते.
दात बोटाने घासू नयेत. बोटाने दात नीट स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढते. दात व्यवस्थित साफ न केल्यास दातांवर कॅल्क्युलस (दगडासारखा थर) जमा होतो. त्यामुळे हिरड्या दातांपासून मोकळ्या होण्याची शक्यता वाढते आणि पुढे दात हलण्यास सुरुवात होते.
दात घासताना योग्य पद्धतीचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन वेळा ब्रश करावा आणि पेस्ट व ब्रशचाच वापर करावा. कडक ब्रश वापरू नये, कारण त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते. नेहमी नरम (डेषीं) ब्रश वापरणे योग्य असते. तोंडातील जंतू कमी करण्यासाठी माउथवॉशचाही वापर करता येतो.
कार्बोहायड्रेटयुक्त पेये, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जास्त चहा पिणे टाळावे. चॉकलेट, बिस्कीट, गोड पदार्थ यांचा वापर कमी करावा. जेवण झाल्यानंतर गुळण्या करणे आणि जीभ स्वच्छ करणे ही सवय लावावी. भरपूर पाणी प्यायल्याने लाळेचे प्रमाण वाढते आणि तोंड स्वच्छ राहण्यास मदत होते.
तंबाखू, गुटखा आणि दारू यांचे सेवन पूर्णपणे टाळावे. या पदार्थांमुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो तसेच दात ठिसूळ होतात आणि हिरड्यांचे आजार निर्माण होतात. दात स्वच्छ करण्यासाठी मिश्री, तपकीर किंवा काळी पावडर यांचा वापर करू नये. या पदार्थांमुळे दातांची झीज होते. दात घासले जातात आणि सेन्सिटिव्हिटीसारखे त्रास निर्माण होतात.निरोगी आणि सुंदर दातांसाठी दर सहा महिन्यांनी आपल्या दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य सवयी, संतुलित आहार आणि नियमित काळजी घेतल्यास दात आयुष्यभर मजबूत व निरोगी राहू शकतात.

It is necessary to take care of teeth from childhood.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago