शिबिरांचा लाभ घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन
नाशिक प्रतिनिधी :
जिल्ह्यातील अस्थिव्यंग आणि दिव्यांगांना खासगी संस्था आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून कृत्रिम अवयव उपलब्ध होणार आहे. एलिम्को संचालित एस. आर. ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यात एडिप योजनेंतर्गत 16 ते 30 जून या कालावधीत सर्व 15 तालुक्यांत यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी (दि. 16) नाशिक तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 42 अस्थिव्यग लाभार्थी यांना हात,पाय व कॅलिपर्स बसवण्यात आले.जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या वत्तीने सदर दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव व सहाभुत साधने इत्यादीचे वाटप करण्यात
येते.
शिबिरात एलिम्कोचे तज्ज्ञ अस्थिव्यंग, दिव्यांगांना कृत्रिम हातपायांसाठी मोजमाप घेवून जागेवरच कॅलिपर्सचे वितरण करण्यात येणार आहे. दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गटविकास अधिकारी सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने 16 ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या या शिबिराचा अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. दरम्यान जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी अस्थिव्यंग व्यक्तींनी आपले आधारकार्ड, रेशनकार्ड व वैद्यकीय प्रमाणपत्र (यूडीआयडी) यांसह आपापल्या भागातील नियोजित प्रमाणपत्रासह ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत सोमवारी नाशिक पंचायत समितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 42 अस्थिव्यग लाभार्थी यांना हात,पाय व कॅलिपर्स बसवण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भरत चौधरी व सुदाम पाळदे उपस्थित होते.
शिबिराचे वेळापत्रक याप्रमाणे
17 जून- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, बागलाण
18 जून- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, चांदवड
19 जून- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, निफाड
20 जून- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, सिन्नर
21 जून- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, इगतपुरी
22 जून- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, दिंडोरी
23 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, पेठ
24 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, सुरगाणा
25 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, देवळा
26 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, कळवण
27 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, येवला
28 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, मालेगाव
29 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, नांदगाव
30 जून-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, त्र्यंबकेश्वर
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…