आ. सरोज आहिरे-आयुक्तांच्या बैठकीत निर्णय; बाजारमूल्याच्या दुप्पट दर मिळणार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेकडून विहितगाव-वडनेर-पाथर्डी या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडून मोबदला कसा देणार यावरून संभ्रम होता. याप्रकरणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांची सोमवारी (दि.16) मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी शेतकर्यांना सरकारी बाजारमूल्याच्या दुप्पट टीडीआर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी आ. आहिरे यांना सांगितले. दरम्यान, शेतकर्यांनी कागदपत्रे सादर करताच प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणासाठी मोजणीला सुरुवात केली जाणार आहे.
विहितगाव-वडनेर-पाथर्डी या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमदार सरोज आहिरे यांनी 4 एप्रिल रोजी विहितगाव येथे याप्रश्नी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत शेतकर्यांची बैठक घेत मतदारसंघातील शेतकर्यांचे नुकसान न होता, त्यांना चांगल्या प्रमाणात टीडीआर किंवा रोख मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्त खत्री यांनी आ. आहिरे यांना शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी मनपा मुख्यालयात आ. आहिरे यांची आयुक्तांसमवेत बैठक झाली. त्यावर चांगला टीडीआर मिळत असल्याने शेतकर्यांनी त्यास संमती दिली आहे.
या बैठकीस नाशिकरोड राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम कोठुळे, अनिल हांडोरे, धनाजी कोठुळे, रवींद्र हांडोरे, माणिक कोठुळे, मुज्जफर सय्यद, मंगेश हांडोरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी आ. आहिरे यांनी तोडगा काढल्यानंतर जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल. मोजणी झाल्यानंतर लगेच शेतकर्यांना पक्का टीडीआर मिळेल. रस्ता रुंदीकरणामुळे परिसरातील विकासाचा आणखी विस्तार होणार आहे. टीडीआरसाठी शेतकर्यांना एकप्रकारे महापालिकेने रेड कार्पेट टाकलेले दिसत आहे.
शेतकरीहित लक्षात घेऊन त्यांचे नुकसान न होता योग्य टीडीआर देण्यात यावा, अशी मागणी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली असता, त्यांनी ती मान्य केली. त्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी मोजणी करून शेतकर्यांना पक्का टीडीआर मिळेल. तसेच इतरही कामे मार्गी लागली जाणार आहेत.
– आ. सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ
रस्ता रुंदीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार असून, शेतकर्यांना विकासासाठी चांगली संधी असेल. तसेच या परिसरात विकासाची व्याप्ती वाढेल.
– विक्रम कोठुळे, उपाध्यक्ष, नाशिकरोड राष्ट्रवादी काँग्रेस
खालील विषयही मार्गी लागणार
आ. सरोज आहिरे यांनी, मनपा आयुक्त खत्री यांच्याकडे देवळालीगाव येथील यशवंत मंडई जीर्ण झाली असून, ती नव्याने बांधावी. वडनेर येथील शाळेची दुरवस्था झाली असून, तिची दुरुस्ती व्हावी, पिंपळगाव येथील पाण्याच्या टाकीचा विषय मार्गी लावून विहितगाव येथील सिग्नलजवळ छोटा पूल (व्हाय डक) या विषयावर चर्चा झाली. आ. आहिरे यांनी मांडलेले मुद्दे लवकर सोडवले जातील, असे आश्वासन आयुक्त खत्री यांनी दिले.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…