नाशिक

122 जागांसाठी भाजपाकडून तब्बल बाराशे इच्छुक

समितीचा इच्छुकांना प्रश्न : निवडणुकीत किती खर्च करणार, ते सांगा!

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींवर भर दिला आहे. त्यात भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे गट यांनी आघाडी घेतली. काँग्रेसनेही कालपासून मुलाखती सुरू केल्या आहेत. भाजपाचे तिकीट मिळावे म्हणून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मनपाच्या 122 जागा असल्या तरी एकट्या भाजपाकडून तब्बल 1200 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. समितीने इच्छुक उमेदवारांना तुम्ही निवडणुकीत किती खर्च करू शकतात, असा प्रश्न विचारत इच्छुकांच्या एकूणच आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्याचेही काम केले.
भाजपाचे वरिष्ठ नेते निवडणूक महायुतीतच लढणार असे सांगत असले तरी भाजपाने शंभर प्लसचा नारा दिलेला आहे. त्यात 122 जागांमध्ये तीन पक्ष जागांचे वाटप कसे करणार? आणि जर महायुती झाली तरी एवढ्या इच्छुकांमधून उमेदवार आणि जागा ठरविणार कसे? त्यामुळे नाराजांमुळे बंडखोरी वाढू शकेल. अशा सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्याचे मोठे आव्हान भाजपाच्या मंडळींपुढे आहे.
भारतीय जनता पक्षाचा शंभर प्लसचा नारा सफल होण्यासाठी नाशिक महानगरातील बाराशे जणांनी मुलाखती देऊन आजपर्यंतचे पक्षीय मुलाखतीचे सर्व रेकॉड ब्रेक केले आहे.
मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्व विधानसभा मतदारसंघातील
प्रभाग 1, 2, 3, 4, 5, 6, 17, 18, 19, 20, 21, 22 मधील इच्छुकांंच्या मुलाखती झाल्या. प्रभाग दोनमधून 52 जणांनी इच्छा प्रदर्शित करत मुलाखती देऊन निवड समितीसमोर आणखी मोठे आव्हान उभे केले. महापालिका निवडणुकीतील उमेदवार निवडप्रक्रियेचा महत्त्वाचा भाग म्हणून गेल्या चार दिवसांत बाराशे जणांच्या मुलाखती आ. सीमा हिरे, राहुल ढिकले, विजय साने, लक्ष्मण सावजी, सुनील केदार, सुधाकर बडगुजर, सुहास फरांंदे यांनी घेतल्या. कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करण्यास मनाई असली तरी आपल्या सांपत्तिक स्थितीचे प्रदर्शन करण्यास मनाई नसल्याने त्याचेही दर्शन काही जणांनी घडविले. कारण सर्व पात्रता असली तरी तुमची आर्थिक क्षमता किती? हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने काही जणांनी तुम्ही फक्त सांगा, असे उत्तर देऊन आपली आर्थिक ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर कोणीही समर्थक आणले नाही. मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि भरलेली प्रश्नावली भरून दिली. काल मुलाखत देणार्‍यांमध्ये माजी महापौर रंंजना भानसी, अशोक मुर्तडक, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, दीपाली गिते, माजी सभागृहनेते कमलेश बोडके, उत्तम उगले, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, महेंद्र बडवे आदींचा समावेश होता. इच्छुकांची संंख्या एवढी मोठी होती की, रात्री दहापर्यंत मुलाखती
सुरू होत्या.

As many as 1200 candidates from BJP for 122 seats
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago