नाशिक

चार हजार घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तपासणी; 59 जणांना डेंग्यूची बाधा

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांत डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरलेल्या नाशकात यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. दरम्यान, नाशिक महापालिका प्रशासनाच्या मलेरिया विभागाच्या तपासणीत तब्बल चार हजार घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याप्रकरणी 281 जणांना नोटिसा दिल्या आहेत. मनपाने तीन महिन्यांत 5 लाख 80 हजार 980 घरांची तपासणी केली. यंदा शहरातील रुग्णांची संख्या पाहता, ती 2023 व 2024 मध्ये रुग्णांची संख्या बाराशे पार गेल्याचे चित्र होते. यंदा मात्र ही संख्या 598 वर नियंत्रणात राहिली आहे.
यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने परिणामी डेंग्यू अळ्यांचे शहरातील हॉटस्पॉट उद्ध्वस्त झाले. दरम्यान, महापालिका प्रशासन डेंग्यू नियंत्रणात ठेवण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतेे. शहरात दोन-तीन वर्षी उच्छाद घालणार्‍या डेंग्यूची रुग्णसंख्या यंदाच्या वर्षी बर्‍यापैकी घटल्याचे चित्र होते. डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या 16 च्या घरात आहे. ऑगस्टमध्ये 124 व सप्टेंबरमध्ये 124, या दोन महिन्यांत वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. तर डिसेंबरमध्ये 59 रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जातात. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी फ्रीज, कूलरमध्ये पाणी साचवू देऊ नये. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून वारंवार केले आहे. गतवर्षी शहरात ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे एक हजार रुग्ण होते. यंदा मात्र ऑगस्ट व सप्टेंबर, ऑक्टोबर वगळता रुग्णांची संख्या पन्नासच्या आत राहिली आहे. मलेरिया विभाग जेथे डास उत्पत्ती केंद्र आढळून येत आहे, ते नष्ट केले जात आहे. रहिवासी भागातील अपार्टमेंटमध्ये, घरातील गच्चीवर, अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये असलेल्या पाण्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याप्रकरणी मनपाकडून नोटिसा दिल्या जात आहेत.

शहरात डेंग्यू नियंत्रणात असून, घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्याप्रकरणी अडीचशेहून नागरिकांना नोटिसा धाडल्या आहेत. यंदा डेंग्यू नियंत्रणात असून, मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत.
– डॉ. योगेश कोशिरे, जीवशास्त्रज्ञप्रमुख, मनपा

Dengue larvae found in 4,000 homes
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago