नाशिक

निवडणुकीचा बिगुल वाजल्याने विविध पक्ष लागले कामाला

राष्ट्रवादी काँग्रेस घेणार इच्छुकांच्या मुलाखती, मनसे करणार इच्छुकांना अर्जांचे वितरण

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणार्‍या राजकीय पक्षांनी आता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाने रविवारी (दि. 14) इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट येत्या गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. मनसे बुधवार ते शुक्रवारदरम्यान इच्छुकांना अर्जाचे वितरण करणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने राजकीय वातावरण शहरात रंगायला सुरुवात झाली आहे.
आठ वषार्ंनंतर मनपा निवडणुका होणार असल्याने यंदाची निवडणूक अनेक अर्थाने नवीन असणार आहे. गेल्या आठ वर्षांत नाशिक शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने एकहाती नाशिक मनपावर झेंडा फडकवला होता. यंदाही भाजपाचा तोच प्रयत्न असणार आहे. मात्र, आता विरोधी पक्षदेखील जोरदार तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.भाजपसह महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना हे पक्षदेखील ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगदार होणार आहे.

मनसेकडून बुधवारपासून अर्जांचे वितरण
नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज (फॉर्म) वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. हे अर्ज बुधवार ते शुक्रवार असे सलग तीन दिवस उपलब्ध असणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठीचे अर्ज राजगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय, ठक्कर बझार, नाशिक येथे उपलब्ध राहतील. अर्ज वितरण व सादरीकरणाबाबत अधिक माहितीसाठी 9850991760 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील नागरिक, समाजसेवक, युवक, महिला तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले सुशिक्षित व जबाबदार व्यक्ती, जे मनसे आगामी महानगरपालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी दिलेल्या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहून अर्ज प्राप्त करून आवश्यक माहिती भरून सादर करावी, असे मनसेने स्पष्ट केले आहे. ही माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, तसेच महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)तर्फे इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षा(अजित पवार गट)मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवार, दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी सहा होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकीत आपला झेंडा रोवण्यास सज्ज झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर मुलाखतीस सर्व प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. शहरातील 1 ते 31 या प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वरिष्ठांच्या उपस्थितीत होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.

nashik

election bell rang,

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago