निफाडचा पारा घसरला ८.८ अंशाची नोंद
निफाड।प्रतिनिधी
महाराष्ट्रातील काश्मीर म्हणुन निफाडचा उल्लेख होण्याचा प्रघात यावर्षीदेखील कायम राहिल असे वातावरण तयार होत आहे मंगळवार दि २६ रोजी निफाडचा पारा ८.८ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे
निफाड तालुक्यात गेल्या आठवड्यापासुन बोचरी थंडी जाणवत होती अशातच पारा घसरत गेल्याने थंड हवामान तयार झाले आहे गेल्या दोन दिवसांपासुन पारा घसरल्याने ऊबदार कपड्यांसह शेकोट्यांभोवती राजकिय विश्लेषणाचे फड रंगात आले आहे. कडाक्याच्या थंडिने द्राक्ष बागाईतदारांना चांगलीच हुडहुडी भरली आहे थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवण थबकली आहे. शिवाय उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागांत घड जिरण्याची समस्या डोके वर काढत आहे थंडीमुळे द्राक्ष वेलीचे शेंडे पाने मुळे यांचे कार्य अडथळले आहे त्यामुळे द्राक्ष बागाईतदारांना पहाटे ठिबकद्वारे पाणी देणे अथवा परिपक्व होत असलेल्या द्राक्ष बागेत शेकोट्या पेटविणे असे पर्याय करावे लागणार असल्याचे जणाकार द्राक्ष बागाईतदारांचे मत आहे
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…