धक्कादायक: युवकावर सपासप वार
नाशिक: प्रतिनिधी
औरंगाबाद नाक्याजवळील विजय नगर कॉलनीतील देवी मंदिरावजवळ एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दीपक काशिनाथ डावरे (वय 22) या युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दीपक हा मैदानात क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी सदाशिव झाबरे व त्याच्यासोबत काही तरुण मैदानावर आले. त्यांनी धारदार शस्त्राने दीपकवर हल्ला केला. या हल्ल्यात दीपक डावरे याचा पोटातील कोथळा बाहेर आला आहे. दीपकची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.