सिटीलिंकने सुरू केली विद्यार्थ्यांसाठी दहा पास केंद्रे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सिटीलिंक बससेवेला नाशिककर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. 13 जूनपासून शहरातील सर्वच प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालय सुरू होत असल्याने बर्‍याच विद्यार्थ्यांकडून विद्यालयात येण्या – जाण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. अशा विद्यार्थ्यांसाठी सिटीलिंकच्या वतीने 50 % सवलतीमध्ये पास दिले जातात. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासक तथा सिटीलिंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या सूचनेनुसार सिटीलिंकने शहरात नवीन बस पास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सद्यस्थितीत सिटीलिंकची सुरू असलेली 4 पास केंद्रे 1) सिटीलिंक कार्यालय येथे दोन पास केंद्रे 2) नाशिकरोड विभागीय कार्यालय 3) तपोवन आगार. विद्यार्थी प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ही पास केंद्रे सुरू केली जाणार आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. मुख्य म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पासेस काढायचे आहेत त्यांनी संबंधित पास केंद्रावर जाण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे सिटीलिंक मुख्य कार्यालयातून प्रमाणित करून घ्यावी. त्यानंतरच विद्यार्थी कोणत्याही पास केंद्रावरून पास काढू शकतात. तर पास नूतनीकरण करावयाचा असल्यास विद्यार्थ्यांना पास केंद्रावर जाण्याची गरज नाही. सिटीलिंकच्या मोबाइल ऍप्लिकेशनवरून देखील पासचे ऑनलाइन नूतनीकरण करता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुरू होणारी पास केंद्रे
1) सिटीलिंक कार्यालय, 2) भुजबळ नॉलेज सिटी, 3) केटीएचएम महाविद्यालय, 4) एचपीटी महाविद्यालय 1/08/2022 पासून सुरू होणारी पास केंद्रे 1) नाशिक महानगरपालिका नवीन सिडको विभागीय कार्यालय, 2) नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय, 3) के. के. वाघ महाविद्यालय, 4) बिटको महाविद्यालय, 5) निमाणी बसस्थानक, 6) नाशिकरोड बसस्थानक, 7) नाशिक महानगरपालिका उपविभागीय कार्यालय सातपूर अशोकनगर, 8) केबीटी इंजिनिअरिंग महाविद्यालय, 9) सिटीलिंक कार्यालय, 10) गुरू गोविंद सिंग महाविद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *