नाशिक

वडाळ्यात भूखंड बळकावण्याचा प्रयत्न उधळला

आयुक्त संदीप कर्णिक-इंदिरानगर पोलिसांची कारवाई, अ‍ॅड. शहा यांना यश

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात बनावट कागदपत्रे, धमकावणे आणि गुंडगिरीच्या जोरावर भूखंड बळकावण्याचे प्रकार वाढत असतानाच, वडाळा परिसरातील एका मौल्यवान भूखंडावर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत हाणून पाडला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पीआय) कारंडे यांनी तातडीने कारवाई करत पीडित कुटुंबाला मोठा दिलासा दिला. या कारवाईत कायदेतज्ज्ञ वकील सुयोग शहा यांच्या तत्पर पाठपुराव्यालाही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महात्मानगर येथील रहिवासी राहुल वसंत वैद्य यांच्या मालकीचा मौजे वडाळा येथील भूमापन क्रमांक 111/3/41/प्लॉट/40 हा मोक्याचा व मौल्यवान भूखंड आहे. राहुल वैद्य यांच्या मातोश्री कै. शैलजा वैद्य यांच्या निधनानंतर राहुल वैद्य आणि त्यांची बहीण हे जागेचे कायदेशीर वारसदार आहेत. संबंधित भूखंडाभोवती पक्के सिमेंटचे कंपाउंड वॉलही उभारण्यात आलेले आहे.
असे असताना स्थानिक भूमाफिया पवन भागवत सोनवणे आणि त्याच्या साथीदारांनी सदर जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने घुसखोरी (क्रिमिनल ट्रेसपास) केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर “ही जागा आमच्या मालकीची आहे,” असा दावा करणारा फलक रात्रीतून उभारून मूळ मालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तक्रारदारांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर राहुल वैद्य यांनी विना-खटला कायदेतज्ज्ञ वकील सुयोग शहा यांच्याशी संपर्क साधला. शहा यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सातबारा उतारा, वारसदार प्रमाणपत्र आणि अन्य डिजिटल पुरावे गोळा करत पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार अर्ज दाखल केला. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्वरित कायदेशीर कारवाईचे
निर्देश दिले. त्यानुसार पीआय कारंडे यांनी गुन्हे शोध पथकाला तत्काळ हालचालीचे आदेश देत संशयित आरोपींविरोधात कठोर पावले उचलण्यास सांगितले. पोलिसांच्या वेगवान हस्तक्षेपामुळे अवघ्या 24 तासांत पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून भूमाफियांविरोधात विशेष मोहीम सुरू असून, बनावट कागदपत्रे, खोटे राजपत्र, फेरफार केलेली ओळखपत्रे आणि बनावट व्यवहारांच्या माध्यमातून जमीन हडप करणार्‍या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या कोट्यवधींच्या फसवणुकीच्या प्रकरणात दोन वकिलांसह 14 आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश इंदिरानगर पोलिसांनी केला होता. या कारवाईमुळे “नाशिक जिल्ह्यात भूमाफियांना थारा नाही,” असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला असून, राहुल वैद्य यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पीआय कारंडे आणि वकील सुयोग शहा यांचे आभार मानले आहेत.

Attempt to grab a plot of land in Wadala foiled.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

3 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

7 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

10 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

17 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

31 minutes ago

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

♦ मालेगाव जलदगती न्यायालयाचा निकाल ♦ पीडितेच्या वारसांना 10 लाखांची मदत ♦ अपहरण व पुरावा…

50 minutes ago