नाशिक

दिंडोरी, सिन्नरमध्ये नियम शिथिल; सारूळच टार्गेट?

वर्षाला 50 कोटींचा महसूल, तरीही 12 खाणपट्टे बंद असल्याने व्यावसायिकांचा सवाल

सिडको : विशेष प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला असल्यामुळे साहजिकच गौण खनिजाची मागणीही वाढत आहे. मात्र, सारूळ शिवारातील 16 पैकी 12 खाणपट्ट्यांचे परवाने निलंबित असल्याने या भागातील खाण व्यावसायिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दिंडोरी व सिन्नर तालुक्यातील अनेक खाणपट्ट्यांमध्ये अशाच प्रकारच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात असताना, सारूळमधील खाणपट्ट्यांवरच कठोर कारवाई का, असा सवाल व्यावसायिकांकडून केला जात आहे.
महसूल विभागाने नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचे कारण देत सारूळमधील 12 खाणपट्ट्यांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यानंतर बहुतांश उत्खनन बंद झाले असून, सध्या केवळ चार खाणपट्ट्यांवरच काम सुरू आहे. यामुळे गौण खनिजाचा पुरवठा कमी झाला असून, शासनाच्या महसुलावरही परिणाम होत असल्याचा दावा खाण व्यावसायिकांनी केला आहे.
व्यावसायिकांच्या मते, सारूळ परिसरातील खाणपट्ट्यांतून शासनाला दरवर्षी सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच ते अनेक वर्षांपासून नियमित रॉयल्टी भरत असून, अधिकृत परवान्यांच्या आधारे व्यवसाय करीत आहेत. सिंहस्थासाठी रस्ते, पूल, घाट आणि अन्य पायाभूत सुविधा उभारणीची कामे सुरू असताना वाढत्या मागणीच्या काळात गौण खनिज उपलब्ध करून द्यायचे कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अवैध उत्खनन करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, याबाबत आमचे कोणतेही दुमत नसल्याचे व्यावसायिकांनी स्पष्ट केले. मात्र, अधिकृत परवानाधारक आणि नियमित महसूल भरणार्‍या खाणपट्ट्यांच्या बाबतीत समान निकष लावले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Restrictions relaxed in Dindori and Sinnar; is Sarul the target?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago