सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

राकेश किशोर वकिलाला घेतले ताब्यात

राकेश किशोर यांची प्रॅक्टिस स्थगित

सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणीदरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी वकिलाला वेळीच रोखले. आता या वकिलाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांची प्रॅक्टिस स्थगित केली आहे.

नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि. 6) अचानक गोंधळ उडाला. एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भरकोर्टात वकिलाने आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, असे ओरडण्यास सुरुवात केली. नंतर सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतले.
पोलीस त्यांना बाहेर काढत असताना, वकिलाने सांगितले की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. दरम्यान, संपूर्ण घटनेत न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहिले. त्यांनी सांगितले की अशा घटनांमुळे त्यांना काहीही फरक पडत नाही.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सरन्यायाधीश एका खटल्याची सुनावणी करत असताना ही घटना घडली. राकेश किशोर नावाच्या साठवर्षीय वकिलाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहे. या घटनेबाबत मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांनीही एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की अशा गोष्टींमुळे ते प्रभावित होत नाही. या घटनेत सरन्यायाधीशांना कोणतीही इजा झाली नाही आणि हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले. या घटनेबद्दल मुख्य न्यायाधीशांनी कोणतीही चिंता न दाखवता खटल्याची सुनावणी सुरू ठेवली. त्यांनी सांगितले, अशी परिस्थिती अनुभवणारा मी शेवटचा व्यक्ती आहे. यासह त्यांनी खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, हल्लेखोर ओरडत होता, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. अशी घोषणा देत त्या व्यक्तीने बेंचवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.

अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही : पंतप्रधान
आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. घटनेनंतर शांतता राखल्याबद्दल त्यांनी सरन्यायाधीश गवई यांचे कौतुक केले. ते म्हणाले, की या परिस्थितीत सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. हे आपल्या संविधानाची भावना आणि न्यायाच्या मूल्यांचे पालनपोषण करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते.

अशा गोष्टींमुळे विचलित होणार नाही
न्यायालयाबाहेर पडताना वकिलाने ओरडून म्हटले की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. तथापि, सीजेआय गवई यांनी घटनेकडे लक्ष दिले नाही आणि वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. त्यांनी वकिलांना सांगितले की, या सर्व गोष्टींमुळे विचलित होण्याची गरज नाही. आपण याने विचलित होत नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *