शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न

शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न
दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद दाखल

दिंडोरी – प्रतिनिधी

उमराळे बुर्दुक तालुका दिंडोरी येथील उमराळे ते उमराळे चौफुली रोडच्या ,जनता विद्यालय या ठिकाणच्या गेटजवळ मयूर सोनवणे,राम विष्णू दरेकर विक्रम राजाराम घाडगे यांनी एका शाळकरी मुलास पळवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाच्या प्रसंगवधाने त्यांच्या अपहरणाचा डाव फसला गेला असून,सदर आरोपी यांना उमराळेकराच्या सहकार्याने दिंडोरी पोलीस ठाणे येथे ताब्यात दिले असून,त्या आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आली आहे,

याबाबत माहिती अशी की,उमराळे तालुका दिंडोरी येथील जनता विद्यालय येथे उमराळे गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असून,कृष्णा अंबादास बोडके वय-१३ वर्ष हा विद्यार्थी ही या शाळेत शिक्षण घेतो, शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असताना, शाळेच्या गेटवर विक्रम घाडगे यांच्या सांगण्यावरून मयूर सोनवणे व राम विष्णू दरेकर यांनी कृष्णा यास तू तालमीत असताना विक्रमकडून उसनवारी पैसे घेतले असून ते परत देवून टाक अशी धमकी दिली,त्यावरून कृष्णाने माझेकडे पैसे नसून असे सांगितल्याचा राग मयूर व राम याना आल्याने,कृष्णा यास दमदाटी करून, मोटर सायकल वर त्यास बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला,कृष्णा याच्या प्रसंगवधाने व उमराळेकरांच्या सहकार्याने आरोपींना ताब्यात घेवून, त्यांच्यावर दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हाची नोंद करून अटक करण्यात आली आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले : राजू शेट्टी

कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…

2 hours ago

केवळ चर्चा, बोलणी कधी?

केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

4 hours ago

मालेगावच्या त्या हॉटेलमध्ये भाजीत आढळले झुरळ

नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…

1 day ago

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल, या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…

1 day ago

नर्मदे हर

नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…

1 day ago

संकोच

*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…

1 day ago