शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, मारहाण
बागलाण तालुक्यातील प्रकार, गुन्हा दाखल
सटाणा:- तालुक्यातील नामपूर येथील अदिवासी वस्तीतील अल्पवयीन मुलीला मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक – शिक्षिकेवर जायखेडा पोलीस ठाण्यात पोक्सो व ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने जायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला
शिक्षिकेने शाळेच्या कार्यालयात मारहाण केली. यावेळी उपस्थित शिक्षकाने मुलीच्या अंगावरील गणवेष काढत मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो काढल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह संबंधितांना अटक करण्यात आल्याची माहिती सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी करीत आहेत.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…