नाशिक

डाळिंबासह पपई, पेरूच्या लिलावास प्रारंभ

लासलगाव बाजार समिती : डाळिंबाला 5,100 रुपये प्रतिक्रेटचा दर

लासलगाव : वार्ताहर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात डाळिंबासह पपई व पेरूच्या लिलावास (दि. 10) उत्साहात सुरुवात झाली. मुहूर्तावर डाळिंबाला 5,100 रुपये प्रतिक्रेटचा दर मिळाला.
नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या वतीने गेल्या 11 वर्षांपासून डाळिंब लिलाव सुरू करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी शेतमाल योग्य प्रतवारी करून आणावा, वजनमापानंतर लगेचच रोख रक्कम (पेमेंट) दिले जाईल, तसेच खरेदीदारांच्या स्पर्धेमुळे चांगला बाजारभाव मिळेल, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. इच्छुक व्यापार्‍यांना तात्काळ परवाने देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार
आहे.
याप्रसंगी बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, प्रभारी हिरालाल सोनारे, व्यापारी सय्यद मोहसीन सय्यद मुश्ताक, जाकीर शेख, तौसीफ बागवान यांच्यासह अनेक व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुहूर्ताचा लिलाव व आवक

डाळिंब : विंचूर येथील शेतकरी निलेश दरेकर यांच्या डाळिंब क्रेटचे पूजन करून लिलाव झाला. मदिना फ्रुट अँड व्हेजीटेबल कंपनीने मुहूर्ताचा डाळिंब रु. 5,100 प्रति क्रेट दराने खरेदी केला. दिवसभरात 305 क्रेट्सची आवक झाली. (दर -किमान रु. 100, कमाल रु. 2,500, सर्वसाधारण रु. 1,500 प्रति क्रेट).पपई : 15 क्रेट्सची आवक. (दर- किमान रु. 200, कमाल रु. 460, सर्वसाधारण रु. 400 प्रति क्रेट).पेरू: 10 क्रेट्सची आवक. (दर- किमान रु. 600, कमाल रु. 1,200, सर्वसाधारण रु. 1,000 प्रति क्रेट).

Auctions for papaya and guava begin alongside pomegranates.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago