राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक
♦ खड्ड्यांमुळे सहा जणांचा बळी
♦ गुरुवारी उपोषणाद्वारे जाहीर निषेध करणार
नाशिक: प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आक्रमक झाला आहे. महानगरपालिका प्रशासनाने खड्ड्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, नागरिकांच्या जीविताच्या प्रश्नासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा शहराध्यक्ष छबु नागरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या खड्ड्यांमुळे पर्यंत सात जणांचा जीव गेला, याप्रकरणी पिडीत परिवारांना 20 लाख रुपये आर्थिक मदत, सरकारी नोकरी, निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करणे तसेच तातडीने खड्डे भरून रस्त्यावर खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे चिखल झाला आहे. त्यावरून नागीरक व गाड्या सरकून पडत आहेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविणे, धोकादायक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच खड्ड्यामुळे होणार्या अपघातांना जबाबदार असलेल्या यंत्रणेवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) नाशिक शहराध्यक्ष छबू नागरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांसहित रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडून वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचार्यांच्या जीवाचा धोका निर्माण झाला आहे. खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांच्या जीविताचा प्रश्न
रस्त्यावरील खड्डे आता केवळ गैरसोय राहिलेली नसून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न बनला आहे. सहा नागरिकांचा जीव गेल्यानंतरही प्रशासन जागे होत नसेल, तर नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे.
The dilapidated condition of the city’s roads.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…