सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको परिसरात असलेल्या इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 परिसरात घरांवर आणि वाहनांवर
दगडफेक करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची घटनास्थळ व परिसरात धिंड काढत कायदा हातात घेणार्यांविरोधात कठोर कारवाईचा संदेश दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपींनी परिसरात आरडाओरड करत घरांवर व रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर एका तरुणीला दगड लागून दुखापत झाली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयित आरोपी लक्ष्मण रमेश दांडेकर (वय 23), रवी दत्ता गायकवाड (वय 21), सचिन विजय दांडेकर (वय 22), हे तिघेही इंदिरानगर वसाहत क्रमांक 1, जुना सिडको येथील रहिवासी आहेत. तसेच स्वप्नील सुभाष जाधव (वय 23, रा. दत्तनगर, चुंचाळे), अमोल संतोष गायकवाड (वय 23, रा. विनयनगर, इंदिरानगर) आणि मिलिंद साहेबराव कांबळे (वय 25, रा. काठे गल्ली, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी इंदिरानगर वसाहतीत पोलीस बंदोबस्तात त्यांची परिसरात धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
Avoid buying gold; use petrol sparingly!
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…