संकलन : अश्विनी पांडे
आई-बाबांचा एक दिवस नसतो. प्रत्येक दिवस आई-बाबांचा असतो. त्यांच्यामुळेच आपण जगात आहोत. त्यांच्याकडून आयुष्यातील प्रत्येक संकटाला कसे सामोरे जायचे हे कळते. वडील माझ्यासाठी मित्रच आहेत. आम्ही खूप बोलत असतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. बाबाच माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. लहानपणापासून आपण त्यांच्याकडे पाहून अनेक गोष्टी शिकलो आहे. आयुष्यात कधीही उमेद हरायची नाही. आयुष्यात काही नकारात्मक घटना घडल्या असतील तर मागे वळून न पाहता नवीन सुरुवात करायची आणि जी गोष्ट करत आहोत ती मन लावून पूर्ण करायची, अर्धवट सोडायची नाही. आपण जिद्दीने आपलं काम करत राहायचं, यश नक्कीच मिळेल हे वडिलांकडून शिकलो. आई-वडिलांच्या रूपाने देवच आपल्या सोबत असतो. आजही मी घराच्या बाहेर पडताना आई-वडिलांच्या पाया पडूनच बाहेर पडतो आणि ‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊ इतका मी मोठा नाही.
– अभिनेता हार्दिक जोशी