अचूक टायमिंग साधल्याची चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून सारेकाही आलबेल नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यातच काही दिवसांपासून नाराज असलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे, खा. संजय राऊत शहरात असूनही बडगुजरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याने यावरून कुजबूज होते आहे. पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजरांवर नाशिक व पुणे महापालिकेची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, असे असूनही बडगुजर नाराज असल्याचे समजते आहे.
बडगुजर यांच्या भेटीची चर्चा थांबत नाही तोच दुपारी शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्याच्या विवाहाला भेट दिली. सोमवारच्या या अनपेक्षित घडामोडींमुळे ठाकरे गटातील वातावरण मात्र ढवळून निघाले आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सुधाकर बडगुजर नाराज होते. पक्षातील पदाधिकार्यांची नाराजी त्यांनी ‘मातोश्री’वर व्यक्त केल्याचे समजते. उपनेतेपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही पक्षाकडून केला गेला. परंतु, तरीही बडगुजर नाराज असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल महिन्यात ठाकरे गटाने निर्धार शिबिर घेतले असता, यावेळी बडगुजर यांनी पक्षातीलच पदाधिकार्यांकडून त्रास देत असल्याचे भर मेळाव्यात सांगण्याचे धाडस केले. मात्र, त्याचवेळी तेथे उपस्थित खा. संजय राऊत यांनी बडगुजरांवर संताप करत विषयावर बोलण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. नाशिक व पुणे महापालिकेची जबाबदारी बडगुजरांकडे देण्यात आली. दरम्यान, सोमवारी फडणवीस एका कार्यक्रमाला असताना बडगुजरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याने ठाकरे गटात उलटसुलट चर्चा सुरू होती.
महापालिकेतील पदोन्नती रखडल्याने त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये तत्काळ लक्ष घालून वर्ग तीन व चार संवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात यावी. बहुप्रतीक्षित नोकरभरती करण्याची मागणी केली. ही भेट पालिकेतील कर्मचार्यांच्या संबंधित होती.
-सुधाकर बडगुजर, उपनेते, उबाठा
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…