नाशिक

उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती विवाहाला, रंग चढला चर्चेला!

विलास शिंदे हा तर आमचा जुना कार्यकर्ता : एकनाथ शिंदे

नाशिक : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा सोमवारी (दि.2) मोठ्या थाटामाटात पार पडला. शिंदे यांच्या कन्याच्या विवाहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिझी शेड्यूल्डमधून वेळ काढत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विलास हा आमचा जुना कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. विलास शिंदे यांच्या आग्रहाखातर आल्याचे सांगत वधू-वराला उपमुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत नाशकात ठाकरेंच्या सेनेत भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली.
शिवसेनेतील बंडानंतर दोन्ही सेनेत विस्तवही जात नाही. पक्षातील प्रमुख एकमेकांना पाण्यात पाहतात आणि एकत्र येणेही टाळतात. परंतु ठाकरे गटातील पदाधिकार्‍याच्या कन्याच्या विवाहाला चक्क उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. दरम्यान, मी आलो म्हणून राजकीय गणिते मांडू नका. आनंदाचा सोहळा आहे, त्यात मी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विवाहस्थळी दाखल आले. दहा ते पंधरा मिनिटे थांबून आशीर्वाद देऊन लागलीच पुन्हा ओझर विमानतळाकडे कूच झाली. ठाकरे गटाचे खा. संजय राऊतांसह स्थानिक पदाधिकार्‍यांनी या विवाहाला उपस्थिती लावली असली तरी एकनाथ शिंदेंच्या भेटीची चांगलीच चर्चा झाली. मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांची शिंदेसेनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत जवळीक दिसते आहे. लवकरच ते पक्षात उडी मारणार असल्याच्या चर्चा होत आहेत. विलास शिंदे यांचे स्वपक्षातील पदाधिकार्‍यांबरोबरच शिंदेसेनेतील पदाधिकार्‍यांशी आजही उत्तम संबंध आहेत. अखंड शिवसेना असताना अजय बोरस्ते व विलास शिंदेंमध्ये घट्ट मैत्री होती. सेनेतील दोन गटांपैकी एका गटात बोरस्ते व शिंदे होते. शिवसेनेत बंड झाल्यानंतर अजय बोरस्ते यांनी शिंदेसेनेची वाट धरली. इकडे ठाकरे गटात विलास शिंदे यांना महानगरप्रमुखपदी बढती मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटातील बरेच पदाधिकारी अस्वस्थ असल्याची खसखस बाहेर येत असते. मागील काही दिवसांपासून अमुक पदाधिकारी शिंदेसेनेत जाणार, तमुक पदाधिकारी भाजपात जाणार, अशा चर्चा झडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विवाहाला येणार असल्याचे रविवारी समोर आले होते.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

24 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

24 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago