नाशिक

बडगुजरांंच्या मुख्यमंत्री भेटीने ‘उबाठा’त अस्वस्थता

अचूक टायमिंग साधल्याची चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून सारेकाही आलबेल नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यातच काही दिवसांपासून नाराज असलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे, खा. संजय राऊत शहरात असूनही बडगुजरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याने यावरून कुजबूज होते आहे. पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजरांवर नाशिक व पुणे महापालिकेची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, असे असूनही बडगुजर नाराज असल्याचे समजते आहे.
बडगुजर यांच्या भेटीची चर्चा थांबत नाही तोच दुपारी शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्याच्या विवाहाला भेट दिली. सोमवारच्या या अनपेक्षित घडामोडींमुळे ठाकरे गटातील वातावरण मात्र ढवळून निघाले आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सुधाकर बडगुजर नाराज होते. पक्षातील पदाधिकार्‍यांची नाराजी त्यांनी ‘मातोश्री’वर व्यक्त केल्याचे समजते. उपनेतेपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही पक्षाकडून केला गेला. परंतु, तरीही बडगुजर नाराज असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल महिन्यात ठाकरे गटाने निर्धार शिबिर घेतले असता, यावेळी बडगुजर यांनी पक्षातीलच पदाधिकार्‍यांकडून त्रास देत असल्याचे भर मेळाव्यात सांगण्याचे धाडस केले. मात्र, त्याचवेळी तेथे उपस्थित खा. संजय राऊत यांनी बडगुजरांवर संताप करत विषयावर बोलण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. नाशिक व पुणे महापालिकेची जबाबदारी बडगुजरांकडे देण्यात आली. दरम्यान, सोमवारी फडणवीस एका कार्यक्रमाला असताना बडगुजरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याने ठाकरे गटात उलटसुलट चर्चा सुरू होती.

महापालिकेतील पदोन्नती रखडल्याने त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये तत्काळ लक्ष घालून वर्ग तीन व चार संवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात यावी. बहुप्रतीक्षित नोकरभरती करण्याची मागणी केली. ही भेट पालिकेतील कर्मचार्‍यांच्या संबंधित होती.
-सुधाकर बडगुजर, उपनेते, उबाठा

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago