मौजे सुकेणेतील मोगलांचा बैलगाडा ठरला अव्वल

जेसीबीसह मोटर सायकल बक्षिसाचे ठरले मानकरी

दिक्षी -सोमनाथ चौधरी
निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब त्र्यंबक मोगल यांचा बैलगाडा देशात अव्वल ठरला आहे त्यांच्यासोबत जुगलबंदी साठी असलेला पुणे येथील बाळासाहेब जवळेकर व बंधू यांच्या बैलासह पुण्यामध्ये ४०० फूट अंतर असलेला घाट माथा चढास्वरुपातील वळण ११.२४ सेकंदात पार करत घाटाचा राजा हा किताब मिळवत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीत अंतिम फेरीतील जेसीबी मशीन या बक्षिसासह व मोटारसायकल पटकावली आहे.मंगळवार ३१ मे सायंकाळी उशिरा पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळील जाधव वाडी येथे फायनल शर्यत संपन्न झाली यामध्ये ११.२४ घाटाचा राजा जेसीबी मशीन विजेता हा बहुमान नाशिक जिल्हातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब त्र्यंबक मोगल यांचा नाशिक जिल्ह्यातील फायनल सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेला गुरु बैल व बाळासाहेब जवळेकर यांचा हिंदकेसरी सम्राट असलेला मन्या बैल या दोघांच्या बैलगाड्याला मिळाला पिंपरी चिंचवडचे आमदार महेश दादा लांडगे यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते संपूर्ण भारतातून नामवंत बैलगाडा या स्पर्धेसाठी पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान,उत्तरप्रदेश,आदी राज्यातील बैलगाडा या स्पर्धेत सहभागी झाले होते मात्र नाशिक जिल्ह्यातील मौजे सुकेणे चे रावसाहेब त्रंबक मोगल यांच्या बैलगाडीने अंतिम फेरी गाठत अंतिम फेरीत पहिल्या पाच मध्ये त्यांचा बैलगाडा अव्वल क्रमांक मारत सामयिक जेसीबी मशीनचे मानकरी ठरत मोटारसायकलही बक्षीस पटकावले ही स्पर्धा २७ मे ते ३० मे या काळात जवळपास १२०० बैलजोड्यांनी या स्पर्धेत भाग घेतला अंतिम स्पर्धा ३१ मे रोजी होती ७० बैल जोड्या मधून अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब मोगल व पुण्याचे बाळासाहेब जवळेकर व बंधू यांच्या बैलजोडीने जिंकल्याने मौजे सुकेणे सह संपूर्ण नाशिक जिल्ह्य़ात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
,

कोरोनाच्या कालावधीत जवळपास दोन वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद होती मात्र आता बंदी उठवल्याने या स्पर्धा सुरू झाले आहे स्पर्धेसाठी आमच्या गुरु बैलाची आम्ही दोन महिन्यापासून तयारी सुरू होती अंतीम स्पर्धा जिंकल्याने आम्हाला आमच्या गुरुचा खूप अभिमान आहे आमच्या गुरूने मौजे सुकेणे गावाचे नाव भारतात केल्याने आम्हाला त्याचा मोठा अभिमान आहे

             प्रशांत मोगल,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *