जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच, चांदवड तालुक्यात युवकाची हत्या

नाशिक:प्रतिनिधी
जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून कालच गंगापूर रोड येथे एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना ताजी असताना आज सकाळी आणखी एक खुनाची घटना
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या गावात उघडकीस आली आहे. वडनेर भैरव येथील राजेश राधेश्याम गुप्ता याने या घटनेबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीनुसार राजेश गुप्ता यांचे वडनेरभैरव येथे भंगार व्यवसाय आहे. या दुकानात सुरज तीलक प्रजापती (17) हा कामाला होता. सुरज हा सकाळी येऊन भंगार गोळा करण्यास जात असे. आज नेहमीप्रमाणे भंगार गोळा करण्यास गेला असता सुरज यास गावात अज्ञात व्यक्ती भेटला. त्या व्यक्तीने सुरज यास ‘तुला जास्त भंगार मिळवून देतो’ असे सांगून सोबत घेऊन गेला. पिंपळणारे परिसरातील जांबुटके धरणाजवळ नेले. या ठिकाणी सदर व्यक्तीने सुरज याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. मारहाणीत सुरज हा जागीच ठार झाला.

गंगापूर रोडला तरुणाचा निर्घृण खून

सुरज हा बराच वेळ झाला तरी पिंपळगावला परतला नाही, म्हणून त्याचा मालक राजेश गुप्ता यांनी चौकशी केली असता त्याला सुरज याचा खून झाल्याचे कळले. त्यानंतर गुप्ता यांनी वडनेर भैरव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *