शैक्षणिक

जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलींची अव्वल कामगिरी

येवला शहरातील एन्झोकेम माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थिनी संस्कृतमध्ये राज्यात प्रथम

येवला ः प्रतिनिधी
फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 5) जाहीर झाला. जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश मिळविले. मात्र, एकूण निकालात मुलींनी सर्वाधिक गुण मिळवून आम्ही हुशार असल्याचे दाखवून दिले.

येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदासशेठ उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एच. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील चार विद्यार्थिनी संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम आलेल्या आहेत. सिद्धी मढवई, सानिका खोडके, पल्लवी ठोंबरे व श्रुती भावसार या विद्यार्थीनींनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
विद्यालयाच्या विज्ञान, कला व वाणिज्य तीनही शाखांचा निकाल 100 टक्के लगला आहे. विज्ञान विभागाची कलाश्री पावटेकर हिने शेकडा 91.83 गुण मिळवून येवला ब केंद्रात प्रथम आली आहे. सिद्धी मढवई 91.33 टक्के, तेजल गुजराथी 90.83टक्के, ओम सोनवणे व जिव्हेश धारणकर 89.83 टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून गायत्री आवारे 87.33 टक्के, वैष्णवी काळे 86.83 टक्के व सायली देशमुख 85.50 टक्के गुण मिळवून केंद्रात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
कला शाखेतून अश्विनी संजय लभडे 86.50 टक्के, अश्विनी समाधान लभडे 85.17 टक्के व अश्विनी साबळे 82.67 टक्के मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष डॉ. मनीष गुजराथी, सरचिटणीस सुशील गुजराथी, कोषाध्यक्ष अशोक शाह व संस्थाचालक, प्रशासनाधिकारी दत्ता महाले, प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक अनिल शेलार, उच्च माध्यमिक विभागप्रमुख कैलास पाटील व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उपप्राचार्य धनवटे, कैलास पाटील, सतीश विसपुते, किशोर सोनवणे, विजय साळुंके, डॉ. सुहासिनी शिंदे, सुनील कोटमे, जनार्दन भनगडे, अंकुश गाडेकर, शीतल शिंदे, स्वाती सानप, गोविंद सुंबे, गीताश्री शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago